मला भेटलेल्या कविता – ३

Submitted by उज्ज्वला अन्नछत्रे on 20 February, 2013 - 09:16

मला भेटलेल्या कविता – ३

हळुवारपणे उतरते प्रेम-कविता निकिता स्तनेस्कूच्यi लेखणीतून..
जितका बुद्धिमान, तितकंच संवेदनशील मन ! सहज-सहज त्याची कविता ओघळते ...अर्थ होऊन.
रोमानियन भाषेमध्ये त्याच्या कवितेला एक नकळत असलेली लय आहे,
भाषांतरात त्याचं सौंदर्य नाही उतरता येत...
कारण शब्दशः अनुवादात अर्थाची तरलता हरवून जाते
म्हणून स्वैर अनुवादाच निदान थोड्या फार प्रमाणात
मूळ कवितेशी समांतर जात राहतो , असं मला वाटतं !
निकिता स्तनेस्कूच्या काही प्रेम कवितांचा आस्वाद घेऊ या..

एका गुरुवारी...प्रेमपूर्वक

संध्याकाळी एका गुरुवारी ,संध्याकाळी हृदय-भरल्या
जेव्हा संचित बहरलं होतं
वसंत-ऋतूतल्या तृणासारखं

मी प्रेम केलं तुझ्यावर
इतकं, कि विसरलो तुला...
वाटलं, माझाच आहेस तू एक भाग !

अन तेंव्हा चकित झालो
मी हसलो होतो, पण तू ..
नाही हसलीस

जेंव्हा झाडांची पानं हलकेच खुडली मी
अन तू..
त्यांखालीच रेंगाळलीस , जरा जास्त ....

अन त्या क्षणी
उमजलं ,
कि तू होतीस कुणीतरी वेगळी
पण फक्त तशी, जसा –
संध्याकाळचा सूर्य असतो वेगळा –
........चंद्र !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! Happy

सुंदर. अशा तरल हळव्या प्रतिभा नेहेमी अल्पायुषी का असतात हे कळत नाही. बालकवी, आरती प्रभू आणि स्तनेस्कू सगळेच या शापाची शिकार

अमेय, कदाचित तो शाप नाही. म्हणजे ती व्यक्ती जगली तरी ते तरल, हळवं फारच क्वचित जन्मभर टिकतं. Happy

आत्ताच सर्व लेख वाचले. आधिच्या कविता कळल्या आवडल्या, ही मात्र कळली नाही तेवढी..

सुसुकु,
फार गोड आहे ही कविता
कवि निकिता म्हणतो, जसा काही सूर्याचं तेज घेऊन चंद्र
येतो म्हणजे तो जणु रात्रीचा सूर्यच आहे ! सूर्याचं रात्रीचं स्निग्ध , मवाळ पण तेजस रूप आहे, तशीच तू माझं
कोमल रूप आहेस ..आपण दोघं एकच आहोत !

सुसुकु, तुमच्यासाठी जरा आणखी सविस्तर ...
अगं सखे, मी समजलो की तू माझाच एक भाग आहेस, पण निसर्गाकडे बघताना ,मनात काही विचार येऊन मी हसताना, माझ्या लक्शात आलं की माझ्या प्रतिक्रियांपेक्शा तुझ्या प्रतिक्रिया वेगळ्या आहेत....मी जेंव्हा हसतो, तेंव्हा तू हसत नाहीस... म्हणजे तू माझ्यापेक्शा वेगळी आहेस पण वेगळी म्हणजे तरी कसा तर ज्या प्रमाणे चंद्र सूर्याचंच तेज घेऊन प्रकाशतो, म्हणजे तो जणू एक प्रकारे
सूर्याचंच मवाळ रूप आहे !!!