भारतीयांचा परदेश प्रवास - कारणे व परिणाम

Submitted by पुग on 20 February, 2013 - 04:33

मनुष्य परदेशी का जातो , त्याची काय कारणे असू शकतात व त्याच्या परदेश गमनाचे काय परिणाम होतात या विषयी माझे विचार मांडावेत हा या लेखाचा प्रयत्न आहे. खरे तर परदेश गमन हे काही मनुष्यास नवीन नाही.गेली अनेक शतके विविध कारणास्तव तो हे करत आला आहे. मी गेल्या सुमारे १०० वर्षातील विविध घटना विचारात घेतल्या आहेत.
मनुष्याची परदेशी जाण्याची इच्छा प्रामुख्याने दोन गोष्टींमुळे मुळे होते
१. वैयक्तिक कारणे
२. सामाजिक कारणे

१. वैयक्तिक कारणे

प्रत्येक व्यक्ती चांगल्या अथवा वाईट हेतूने परदेशात जाते . वाईट हेतूंच मूळ हे षडरिपू आहेत. काम, क्रोध , मोह, लोभ, मद , मत्सर हेच सर्व वाईट घटनांचे मूळ आहे यात काही शंका नाही .

चांगली कारणे ढोबळ मानाने पुढील प्रमाणे असतात
• वैयक्तिक आर्थिक/ बौद्धिक/शारीरिक विकास व त्या अनुषंगाने येणारे अनेक फायदे
• मनोरंजन
• आरोग्य

काही संभाव्य वैयक्तिक कारणे
1.भारतातील उपलब्ध संधींपेक्षा पेक्षा अधिक उत्तम शैक्षणिक व आर्थिक सुविधांचे आकर्षण अथवा गरज
2.आप्त - स्वकीयांविषयी (कमालीची ) अनास्था
3.भारताच्या लोक्संखेयेने निर्माण केलेली स्पर्धा व अशा स्पर्धेस सामोरे जाण्याची अनिच्छा
4.विविध व्यसनांच्या पूर्तीसाठी गरज असलेल्या अनेक गोष्टिंची सहज उपलब्धता
5.आपल्या संपर्कातील लोकांपेक्षा खूप श्रीमंत होण्याची महत्वाकांक्षा
6.परदेशात जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व तडजोडींची तयारी ( शारीरिक , मानसिक , आर्थिक )
7.घरातील वडिलधाऱ्या मंडळींचे अपेक्षांचे (न पेलणारे) ओझे
8.विविध कारणांनी नातेवैकांशी असलेले (पराकोटीचे) मतभेद
9.आपल्याला काय पटते , काय आवडते , काय पटत नाही हे वडिलधाऱ्या मंडळीना (समजावून) सांगता न येणे व ते सांगतील ते बिन बोभाट स्वीकारणे ...अथवा नाकारणे
10.स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व , स्वतःची स्वतंत्र सत्ता निर्माण करण्याची सुप्त अथवा प्रकट प्रबळ इच्छा असणे
11.भारतातील उपलब्ध सोयींपेक्षा चांगल्या सोयींचे (प्रचंड ) आकर्षण अथवा गरज
12.लोकरंजन व लोकप्रबोधन
13.स्व-रंजन व स्व-प्रबोधन
14.परदेशातील उत्तम गोष्टींचा स्वीकार करून त्यांचा भारतीयांसाठी वापर करण्याची इच्छा व तसे प्रयत्न करण्याची तयारी.
15.देश प्रेमाचा अभाव / कमतरता .

२. सामाजिक कारणे
• पारतंत्र्य
• नैसर्गिक आपत्ती
• समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा
• अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी
• समाजातील वैचारिक व व्यावहारिक स्वातंत्र्याचा अभाव
• संघटन
• धर्म प्रचार व प्रसार
प्रामुख्याने पूर , दुष्काळ , भूकंप, वादळे या सारख्या कारणांनी आजवर मनुष्याने स्थलांतर केले.
(सुदैवाने अजून आमच्या पिढीने महाभयंकर नैसर्गिक आपतीना तोंड दिले नाहीये. )

साधारणतः १८९० ते १९५० हा कालखंड विचारात घेतला तर स्वामी विवेकानंद , लोकमान्य टिळक , स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस , डॉ. होमी भाभा , महात्मा गांधी अनेक स्वातंत्र्यसैनिक , टाटा , गोदरेज यांच्या सारखे उद्योजक, अय्यंगार गुरुजी असे अनेक प्रकारचे लोक परदेशात गेले. या सर्वांचे त्यांच्या क्षेत्रातील स्थान , त्यांची देशभक्ती , ध्येयनिष्ठा या सारखे गुण वादातीत होते . सर्व जण देश प्रेमाने भारावून गेले होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे व ते सर्वसमावेशक असावे हाच त्यांचा मूळ हेतू होता .मला असे वाटते कि बऱ्याच अंशी त्यांचे हेतू सफल देखील झाले . त्या काळात प्रामुख्याने अत्यंत हुशार ,कष्टाळू , प्रभावी , तेजस्वी , देशप्रेमी , दूरदृष्टी असलेले लोक परदेशी जात असत.त्यामुळे त्यांचा जनमानसावर दूरगामी परिणाम होत असे. विवेकानंदांमुळे जगाला हिंदू विचारांची नव्याने ओळख झाली , टिळकांनी इंग्रजांना जाब विचारला पाहिजे हि भावना निर्माण केली , सावरकरांनी क्रांतिकारंका मध्ये ध्येयाची , त्यागाची ज्योत पेटवली, सुभाषचंद्र बोसांनी मित्र राष्ट्रांची मदत घेऊन फौज उभी केली व इंग्रजांवर दबावगट निर्माण केला टाटा , गोदरेज यांनी उद्योजाकतेची कास धरली , भाभांनी वैज्ञानिक प्रगतीचा ध्यास घेतला तर गुरुंजीनी प्राचीन योग शास्त्राचा सर्व जगास नव्याने परिचय करून दिला व त्याचे महत्व पटवून दिले .

स्वातंत्र्यानंतर मात्र परिस्थिती झपाट्याने बदलू लागली . "मी व माझे" यालाच कमालीचे महत्व आले .
डॉ. मुरलीमनोहर जोशी , डॉ. माशेलकर , डॉ. कुरियन यांच्या सारखे लोक अपवादात्मक दिसू लागले. बहुतांशी लोक एका वेगळ्याच प्रवाहात सामील होऊ लागले. अनेकांना स्वदेश , स्वधर्म , स्वभाषा यांचा पूर्णपणे विसर पडू लागला .
१९७० च्या सुमारास तर या गोष्टीचा विसर पाडण्यात काही गैर आहे याचा विचार देखील मनात येईनासा झाला. आणि मग मात्र सर्वच गोष्टी प्रचंड वेगाने बदलू लागल्या .एकत्र कुटुंब पद्धती अत्यंत झपाटयाने लयाला गेली , घरातील जुने संस्कार मातीमोल ठरविले गेले . निष्ठा या एका अलौकिक गुणाचे मोठ्या प्रमाणात अवमुल्यन झाले.
भारतातील सर्वच गोष्टीना नावे ठेवण्याची एक चढाओढ सुरु झाली. चांगल्याला चांगले म्हणावे व वाईटाला वाईट हा वागण्या बोलण्यातील 'विवेक' लोप पाऊ लागला. मातृ ऋण , पितृ ऋण, गुरु ऋण, समाज ऋण या सर्वांचा मोठ्या प्रमाणात विसर पडला. ज्या शिक्षकांनी , आई -वडिलानी , समाजाने आपल्याला घडवले त्यांचे आपण ऋणी आहोत ही भावनाच नष्ट होऊ लागली . मध्यंतरी तर माझ्या एक उच्च शिक्षित मित्राने पूजनीय डॉ. हेडगेवार , पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या सारख्या अनेक प्रातः स्मरणीय लोकांनी केलेल्या त्यागाचे , सुधारणांचे, संघटनेचे मोलच शुन्य आहे असे विधान केले. त्याच्या दृष्टीने शिवाजी महाराज ते आज पर्यंत ज्यांनी अनेकांचे भले व्हावे या साठी जे काही केले ते व्यर्थ आहे.
असे विचार ऐकले कि अंगावर काटा येतो!

पैशाला अनन्यसाधारण महत्व आले आहे. भारतीय असल्याचा रास्त अभिमान ते भारतीय असल्याची लाज वाटणे हा प्रवास अत्यंत वेगाने झाला आहे.

असो , सवड झाली की उपाय पण मांडणार आहे .!

समर्थांनी जशी अनेक लक्षणे सांगितली , त्याच प्रमाणे अनेक कारणे शब्दात मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे.
बरेच दिवस या बाबतीत काही तरी लिहावे असे वाटत होते, म्हणून लिहिले .

सवड काढून हा छोटासा लेख वाचल्या बद्दल आभार.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सवड काढून हा छोटासा लेख वाचल्या बद्दल आभार.
<<
हं. लिहिण्याचे कष्ट केल्याबद्दल आभार. (काहो? तुमचं जमलं नाही वाट्टं?)
- (षड्रिपूग्रस्त) इब्लिस.

हेहेहे.. गांधीजी, आंबेडकरपण परदेशात गेले होते, त्यांचे नाव आले नाहिये लेखात (ही दोन्ही नावे प्रातःस्मरणात असतात हे तुम्ही विसरलेले दिसता). एका वाक्यात 'भंपक लेख' आहे.

मी काय म्हणतो राव,
रामायणातील राम लंकेला, गदर मधील सनीपाजी अन वीरझारा मधील शाहरुख पाकिस्तानला, यापैकी कोणत्या कारणासाठी गेले होते. Wink

काय कळलंच नाही.

स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीही अनेक लोकं केवळ उच्चशिक्षण आणि नोकरीकरता परदेशी गेले होतेच ना? आताही त्याच करता जातात.

बाकी, ज्या लोकोत्तर व्यक्ती आहेत त्या परदेशात गेल्या काय किंवा न गेल्या काय आपापल्या कर्माने लोकोत्तर ठरतात. त्यांच्या परदेशी जाण्याचा त्यांच्या कामाशी, विचारांशी, सामाजिक कार्याशी काय संबंध? आणि सगळेच परदेशी जाणारे स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, डॉ. होमी भाभा, महात्मा गांधी, टाटा, गोदरेज, अय्यंगार गुरुजी कसे बनणार?

आपलं एक छान असतं की कोणा परदेशी लोकांनी इथे येऊन इथली जीवनसरणी आपलीशी केली की त्यांचं कौतुक करायचं पण तेच आपल्या लोकांनी परदेशात जाऊन तिथल्याप्रमाणे वागलं की त्यांना दोष द्यायचा.

ज्यांना परदेशात जायचंय त्यांना जाऊ द्या. कशाकरता जाताहेत त्याच्या उचापती आपल्याला कशाला? आपल्या ज्ञानेश्वरांनी म्हणून ठेवलंच आहे : हे विश्वचि माझे घर, ऐशी मति जयाची थोर, किंबहुना चराचर आपणचि जाला.

^^^^^
अगदी बरोबर
हे विश्वची माझे घर
उद्या लोक्स चंद्रामंगळावर जातील तेव्हा मी नाही हा बाबा माझी पृथ्वी सोडून कुठे जाणार असे रडगाणे गाण्यात काय अर्थ आहे.

मॉरल ऑफ द स्टोरी - जशी दळणवळणाची साधने समृद्ध होत जाणार तसा मनुष्यप्राणी आणखी आणखी भरारी घेतच राहणार, शेवटी अंड्यातून बाहेर पडणे हा निसर्गनियमच आहे.

१. मी गांधीजींचा उल्लेख केला आहे. अनेक थोर परदेशात जाउन परत आले. मी फक्त काहींचा उल्लेख केला आहे.
२. हे विश्वचि माझे घर हे मान्य , पण मी ज्या ऋणांचा उल्लेख केला आहे त्यांची पूर्तता पण आवश्यक आहे . सध्या ते होताना कमी प्रमाणात दिसते
३. रामायणातील राम लंकेला, गदर मधील सनीपाजी अन वीरझारा मधील शाहरुख पाकिस्तानला, यापैकी कोणत्या कारणासाठी गेले होते
प्रभू श्रीराम अनेक कारणांनी श्रीलंकेला गेले होते , त्यातील काही कारणांचा मी उल्लेख केला आहे . सर्व कारणे लिहिणे म्हणजे रामायण सांगावे लागेल !
आपण जर लेख नीट वाचलात तर त्यात "लोकरंजन" असे म्हटले आहे, अनेक कलाकार त्या साठी परदेशात जाऊन येतात

<<<"मी व माझे" यालाच कमालीचे महत्व आले .पैशाला अनन्यसाधारण महत्व आले आहे.
चांगल्याला चांगले म्हणावे व वाईटाला वाईट हा वागण्या बोलण्यातील 'विवेक' लोप पाऊ लागला.
अनेकांना स्वदेश , स्वधर्म , स्वभाषा यांचा पूर्णपणे विसर पडू लागला .
घरातील जुने संस्कार मातीमोल ठरविले गेले . निष्ठा या एका अलौकिक गुणाचे मोठ्या प्रमाणात अवमुल्यन झाले.>>>

या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिल्या आहेत त्याचा परदेशी जाण्याशी काय संबंध? लोक परदेशी जाउ लागले म्हणून असे झाले? की जे परदेशी जातात येतात त्यांच्यामधेच फक्त असे दिसते?

कुणिहि कुठेहि परदेशात न जाताच, मुसलमान नि पाश्चिमात्य लोक भारतात आले आणि स्वधर्म, स्वभाषा यांचे काय झाले हे तुम्ही जाणताच.

तुम्हाला काय उपाय सुचवायचे आहेत त्याची वाट बघतो आहे. पण परदेशी जाणे आता थांबणार नाही. जग बदलले आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ११० कोटी भारताच्या लोकसंख्येत असे परदेशी जाणारे कितीसे? न जाणार्‍या बहुसंख्य लोकांनी त्यांना बदलायचे का उलटे?