''झेंडा फडकत नाही''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 February, 2013 - 02:29

काही करमत नाही
काही समजत नाही

जिणे शिकारी झाले
आता धडगत नाही

जग सारे आभासी
म्हणून फसगत नाही

सभेस तोबा गर्दी
झेंडा फडकत नाही

पुरुष लाजतो,तरुणी
लाजत मुरकत नाही

शिक्षक पोलिस दिसता
कोणी चरकत नाही

मनासारखा मथळा
कुठेच झळकत नाही

अमानवी कृत्याला
''माणुस'' कचरत नाही

रवंथ राजनितीचा
ढोरही चघळत नाही

मनास थकवा आला
आता पळवत नाही

हा ''कैलास'' असावा
असे बोलवत नाही

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक, मथळा (शेर) मस्तच... Happy

ह्या गज़लेत मात्रा राखल्यात, मीटर नाही, बरोबर का?
आणखी एक शंका आहे, रवंथ करणे, हीच एक प्रक्रिया आहे ना. पुन्हा त्या रवंथास चघळणे म्हणजे नेमकं काय? मला झेपला नाही कॉंसेप्ट.

मनासारखा मथळा
कुठेच झळकत नाही

मनास थकवा आला
आता पळवत नाही

हे दोन शेर आवडले. दुसरा मस्त आलाय.

अमानुष - अमानूष

पळवत नाही चांगला आहे, मुरकत नाही चांगला आहे

शेवटच्या शेराचा काही म्हणजे काही अर्थ लागला नाही.

मध्यंतरी एक द्विमात्रिक येऊन गेली होती त्यापेक्षा चांगली आहे

जग सारे आभासी
म्हणून फसगत नाही

मनासारखा मथळा
कुठेच झळकत नाही

अमानुष कृत्याला (बहुतेक अमानूष करावे लागेल)
''माणुस'' कचरत नाही

मनास थकवा आला
आता पळवत नाही

हा ''कैलास'' असावा
असे बोलवत नाही<<<

वा वा! शेर आवडले. गझलही आवडली. सभेस तोबा गर्दी हा मनसेला मारलेला टोमणा वाटला व त्यामुळे आवडला.

वेगळी व चांगली सामाजिक आशय असलेली गझल.

धन्यवाद.

आवड्ले...सारेच शेर सुंदर्...पण
जग सारे आभासी
म्हणून फसगत नाही

शिक्षक पोलिस दिसता
कोणी चरकत नाही

मनासारखा मथळा
कुठेच झळकत नाही

अतिशय आवड्ले.

अमानवी कृत्याला
''माणुस'' कचरत नाही

रवंथ राजनितीचा
ढोरही चघळत नाही

मनास थकवा आला
आता पळवत नाही

थोडे नकारात्मक वाटतात.

सभेस तोबा गर्दी
झेंडा फडकत नाही

मनासारखा मथळा
कुठेच झळकत नाही

अमानवी कृत्याला
''माणुस'' कचरत नाही

हा ''कैलास'' असावा
असे बोलवत नाही

>> हे खूप आवडले..

मक्ता तर जामच !

"सभेस तोबा गर्दी
झेंडा फडकत नाही

शिक्षक पोलिस दिसता
कोणी चरकत नाही

मनासारखा मथळा
कुठेच झळकत नाही" >>> हे शेर सर्वात आवडले.

खूप खूप आवड्ली
काफियाकडे सरकता सरकता प्रत्येक शेराची मजा कैक पटीने वाढ्ते
खूप मजा आली
सर्व शेर आवड्ले

जग सारे आभासी
म्हणून फसगत नाही
व्वा..!
हाच शेर आवडला.

मात्र,
बाकी...

>>>हा ''कैलास'' असावा
असे बोलवत नाही<<<

असे वाटले....

मक्तावरून मला माझा एक शेर आठवला

हे मला वाटू नये 'मी' भेटल्या वरती
भेट ज्याची घ्यायची तो हाच आहे ना

गझलुमिया तुम्हाला डॉ.साहेबांचा मक्ता समजून घ्यायला माझ्या या उपरोक्त शेराचा उपयोग होईल असे मला वाटते मलातरी झाला आहे Happy

अमानवी आणि थकवा हे शेर आवडले! थकवा तर फारच!!

शेवटचा शेरात मला वाटतं 'बोलवत' मुळे थोडं गोंधळायला होतं. वैवकु च्या शेरा सारखाच अर्थ मीही लावला. पण वैवकुचा शेर अगदी थेट आणि स्पष्ट येतो, भिडतो आणि कळतो. डॉ. साहेबांच्या शेरात, बहर लहान असल्यानेही अर्थातच बंधन येते, ते होत नाही. कदाचित, सानी मिसरा 'खरेच वाटत नाही' असा काहीतरी असायला हवा होता का? 'वाटणं' / 'बोलवणं' पैकी इथे 'वाटण्याची' अर्थछटा जास्त चपखल झाली असती असं मला वाटतं.