पैज लावून..

Submitted by प्रसाद पासे on 19 February, 2013 - 13:31

पैज लावून मधु हरे अन शर्कराही लाजते
का तुझ्या ओठांस काळी मुंगीदेखील चावते

तीळ का हे राखणीला नेमक्या जागी असे?
नजर ना पोचे तिथेही दृष्ट का तुज लागते ? (!)

उगवताना कोर चंद्राची तुला बघुनी म्हणे
तू घरी लपुनी रहा, संसार मग मी थाटते!

पावसाळी वय असे अन घाट देहाचा तुझ्या
चाल दमाने, वळण धोक्याचे मला मन सांगते!

चिंब तू होता पडे ठिणगी, उडे चकमक अशी
जाळतो पाऊस तुजला, पावसा तू जाळते!

आग प्रेमाची कधी ना एकतर्फी वागते
जळतसे तोही जळे अन जाळत्याही जाळते!

भांग तिरपा, नजर तिरपी, वृत्तीही तिरपी अशी
सरळ रस्त्यावरसुद्धा ती नागमोडी चालते!

का बरे इतक्या दिसांनी पाहुनी हसलीस तू!
सांग, कारस्थान हे कुठले नव्याने घाटते ? (!)

~संदीप खरे~

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसादपंत,
मायबोलीवर स्वतःचे लिहिलेले काव्य, ललित इ. लिहावे असा संकेत आहे.
संदीप.खरे हे तुमचेच नांव आहे काय?
नसेल चुकून कॉपी पेस्ट केले असावे तुम्ही. अ‍ॅडमिन यांना विनंती करून काढून टाकायला सांगा.