मस्ती

Submitted by असो on 19 February, 2013 - 12:01

ते वास्तव लोळ आगीचे
कि नराधमांची मस्ती
कुत्रीही पाहत होती
ती धडधडणारी वस्ती

ही मिजास कसली अंगी
फुकटच्या सात बाराची
धमन्यांना हवीये पाती
जाळून केली का माती

सुटलेत हल्ली कलमकसाई
शब्दांना नाही शीव
मुडदेफरास बरे म्हणावे
एकदाच जातो जीव

- अनिल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिल ?

सुरूवात खूपच जबरदस्त , लयबद्ध आणि आवेशपूर्ण , पण पुढे टिकण्यात अपयश आले असल्याचे स्पष्ट जाणवते .
विशेषतः
जाळून केली का माती ?
या ओळीपासून पुढे पुन्हा एकदा विचार व्हावा असं वाटतं .
वै म कृ गै न .