नंदनवन फुलले (पाळणा)

Submitted by कविन on 19 February, 2013 - 03:44

बोल बोबडे घरी गुंजतील
निर्मळ हसणे मना शांतवील
लोभस रुपडे क्रिष्णाचे हे
तुझ्या घरी अवतरले
पाहुनिया हा सुख सोहळा
मन माझे हर्षिले

कवटाळीशी तू जेव्हा कान्हा
प्रसवेल ममतेचा पान्हा
प्रेमाचे हे रुप अलौकिक
पाहुनी लोचन हे भरले
घराचे गोकुळ की झाले

आई म्हणूनी हाक ऐकता
रोमांचित ग होईल काया
अवीट अशा ह्या आनंदावर
नको कधी दु:खाची छाया

राहो गोकुळ सदा सुखी हे
आशिर्वचन देवा मज द्यावे
हसले बाळ नि बाळा संगे
घर सारे हसले
तुझ्या कृपेने घरामधे
ह्या नंदनवन फुलले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आजवर पाळण्याची एकच लय ऐकली आहे

गागाल गागा गागाल गागा
गागाल गागा गागाल गागा
गागाल गागा गागाल गागा...जो बाळा जो जोरे जो !!!

ही तुमची लय नाही आवडली
ही फार्तर अंगाई होवू शकेल

असो काव्ब्यु खूप छान आहे आवडले Happy

वानगी दाखल हा पाळणा पाहू शकता......

धन्यवाद

पाळणा आहे, अंगाई आहे की गवळण की अजून काही माहित नाही.

बारशाच्यावेळी आई आणि बाळासाठी आशिर्वाद पर म्हणा/ शुभचिंतनपर म्हणा असं काही गीत गातात (हे गीत आहे असही माझं म्हणणं नाही) तर ह्या तशा कारणासाठीच्या शुभेच्छा आहेत. बरिच जवळची लोकं ह्याला पाळणा गीत/ बारसं गीत असं म्हणताना ऐकलय म्हणून त्याला पाळणा म्हंटलय इतकच.

माझ्यासाठी मनापासून जे वाटलं ते कागदावर उतरलं इतकच. Happy

मल्ल्या, नको धाववूस तुझं डोकं इतकं Proud ह्या शुभेच्छा दुसर्‍या प्रती आहेत. तरी तुझ्या अभिनंदनाचा स्विकार आहे. Wink Proud