अव्यक्त

Submitted by विस्मया on 18 February, 2013 - 12:31

काहीही म्हण
पण जाणवतंच मला ते
फोनवर बोलतानाच्या आवाजातली थरथर
धाप लागल्यागत ते बोलणं भरभर
काळजी करायला लावायचं..मग
देव पाण्यात सोडून बसणं
तुझ्या स्पंदनांशी एकरूप होणं
आणि हसरा आवाज कानी पडताच
माझं माझ्यात परतणं..
हे तसं नवीन नव्हतं
तुलाही आणि मलाही
पण
त्या दिवशी फोनवर
जेव्हां तुझ्या श्वासातली
लय अनोळखी वाटली..तेव्हांच
हे सारं संपल्याची जाणिव झाली
तुलाही आणि मलाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पंदनकाव्य!!!! बरोबरय ना

मला हल्ली काही कविता काही ओळी वाचल्यावाचल्यावर एक जाणिव होवू लागते की या कवीने ह्या ओळी नुसत्याच लिहिल्यानाहीयेत तर खर्‍यखुर्‍या आयुष्यात जगून पाहिल्यात वगैरे .............खूप अस्वस्थ व्ह्यायला होतं !!! Sad

याही इथे जाणवले ................
स्पंदनकाव्य मस्त शब्द समजला तुमच्यामुळे (समीरजींच्या कवितेवरील प्रतिसादात वाचला मी)

धन्स

वैवकु धन्यवाद.
स्पंदनकाव्य हा शब्द कवी /गीतकार डॉ. राहुल देशपांडे यांच्यामुळे माहीत झाला. कदाचित हा शब्द त्यांचे गुरू सुधीर मोघे यांचं अपत्य असावं..

आई गं...... बेचैन केलंस यार...... !!
शब्दांमधे हे उतरवणं ........कमाल !!

वाह !