वस्ती

Submitted by -शाम on 18 February, 2013 - 11:41

ही कर्मदरिद्री वस्ती
चिलटांची भणभण नुसती
जंतू बरबटले घेती
ना वळवळण्याची तसदी

या खडकांवरुनी जातो
धडकून सूर्यही मागे
बेफिकीर हे वणवणती
समशानी जैसे जोगे

येतात पांढरी कुत्री
दिवसा वा अर्ध्यारात्री
जनल्यावर होते चर्चा
उगवली कुणाची छत्री

चिकटुन बसल्या जातीच्या
कुबड्यांची ऊब सुटेना
मनगटातल्या धमन्यांची
फटफट ऐकू येईना

नाचवून क्रांतीज्योती
स्मरणांचे उत्सव होती
आधार वर्तमानाचे
कवटाळत बसती माती

मी जपतो अंकुर काही
तेजाचे घालुन पाणी
पण फुटक्या पाटीवरती
टिकतील कोठवर गाणी

....................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या काव्यावर खालील लोकांचे सकारात्मक प्रतिसाद निश्चीत आहेत.

कवी पेशवा

कवी ट्यागो

प्रतिसादक गंभीर समीक्षक

आकाश व राजकारण तज्ञ गा मा पहिलवान

कवी बेफिकीर

कुशल संघटक, कवी व वैद्य कैलास गायकवाड

इतर

अनेक ओळी आवडल्या

कळावे

गं स

खूप खूप आवडली ...............

अप्रतीम झाली आहे(तुमची प्रत्येक कविताच दिवसेंदिवस अधिकाधिक अप्रतीम होत चालली आहे )

विषय जातीपातीचा आहे का ? ...किंवा समाजातल्या एका विशिष्ट सामाजिक -आर्थिक इत्यादी स्तरातील लोकांचा ?
(कविता मला बरीचशी समजलेलीच आहे तरीही विचारून ठेवले सहजच ...)

व्वाह!!! डोळ्यासमोर उभं केलंत चित्र! Happy

मी जपतो अंकुर काही
तेजाचे घालुन पाणी
पण फुटक्या पाटीवरती
टिकतील कोठवर गाणी
>> सुरेख!!

मी जपतो अंकुर काही
तेजाचे घालुन पाणी
पण फुटक्या पाटीवरती
टिकतील कोठवर गाणी

सुंदर.
सामाजिक आशयाचं आपण छान लिहीता.
काय म्हणायचे ते जाणवतेय. पण पार्श्वभूमी समजून घ्यावी लागते.
काही ठिकाणी लाउड झालीय. अर्थात सत्यही तसेच.