सध्या मी माझं भारतातील "फॉर गुड" आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. मला "भारतात परत का आलात?" हा प्रश्न हमखास विचारला जातो. याला बरीच वैयक्तिक आणि नॉट-सो-वैयक्तिक करणं आहेत. त्यातील दुस-या श्रेणीतील सगळी महत्वाची आणि पहिल्या श्रेणीतील एकच मी सांगणार आहे
त्या आधी मला इथे आवर्जून असं सांगायचं आहे की हा लेख अमेरिकेत (किंवा परदेशात) राहणाऱ्यांच्या विरोधात अजिबात लिहिलेला नाहीये. कधी, कुणी, का आणि कसं परत यावं, किंवा का येऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भारतात परत येण्याच्या निर्णयात "ऐसा देश हैं मेरा", किंवा "आय लव्ह माय इंडिया" वगैरे गाण्यांचा अजिबात हात नव्हता. आणि माझं परदेशातील वास्तव्य आणि मित्र मंडळ अतिशय आनंदी आणि मजेदार होतं. एकटेपणा किंवा एकटेपणाची भीती हेही माझ्या निर्णयामागचं कारण नाही. मी अजूनही माझ्या ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत झालेल्या काही परदेशी मित्र-मैत्रिणींशी अगदी रोज बोलते. आणि त्यातील काही लोक मला भेटायला भारतात यायचे बेतही करतायत.
पण परदेशात आणि खास करून अमेरिकेत न राहण्याचं एक कारण म्हणजे तिथलं वास्तव्य कायम व्हिसावर अवलंबून असतं. आणि ९/११ नंतर दोन वेळा अमेरिकेच्या व्हिसा प्रक्रियेतून गेल्यावर मला तिसऱ्या वेळी त्यातून जायची अजिबात इच्छा नव्हती. माझी शैक्षणिक शाखा आणि माझा भारतीय पासपोर्ट मला अमेरिकेच्या TAL (Technology Alert List ) मध्ये समाविष्ट करतो. या यादीत आतंकवादी ज्या ज्या तांत्रिक माहितीचा वापर करू शकतो त्या सगळ्या शाखा येतात (केमिकल, बायोमेडिकल, बायोलॉजी इत्यादी). त्यात जर तुम्ही ठराविक देशाचे नागरिक असाल तर सहा ते सात महिनेसुद्धा लागू शकतात. त्यामुळे अमेरिकन व्हिसा मिळवताना नेहमी मला २२१ g, हा फॉर्म देऊन चार ते सहा आठवडे थांबावं लागतं (यात व्हिसा मिळेल याची हमी नसते. काही लोकांना सहा महिन्यानंतर नकार आल्याच्या केसेस आहेत). पहिल्यांदा जेव्हा मी या २२१ च्या चक्रात अडकले होते तेव्हा मी ऑस्ट्रेलियात होते. माझ्या बरोबर व्हिसा साठी आलेल्या माझ्या युरोपियन सहकार्याला एका दिवसात व्हिसा मिळाला. मला तब्बल अडीच महिन्यांनी माझा पासपोर्ट परत मिळाला. तोपर्यंत माझे सगळे सहकारी कॉनफरन्स उरकून परतही आले होते. तेव्हा मला अमेरिकेला जाता येत नाही यापेक्षा मी परदेशात पासपोर्टशिवाय राहते आहे याचाच जास्त राग येत होता. काही दिवसांनी "मला व्हिसा नको पण माझा पासपोर्ट परत द्या" म्हणून त्यांना फोन केला तेव्हा मला अतिशय उद्धटपणे, "तुमचा पासपोर्ट FBI कडे देण्यात आलाय आणि आम्ही काहीही करू शकत नाही" असं सांगण्यात आलं.
या २२१ g मुळे गेल्या काही वर्षांत कित्येक शास्त्रज्ञ ठरवलेल्या कॉनफरंसला वेळेत पोहोचू शकले नाहीत. काही काही लोकांची व्हिसा रिन्यू करताना अडकल्यामुळे परिवारापासून सहा सहा महिने ताटातूट झाली आहे. काही विद्यार्थ्यांचे एक सेमिस्टर वाया गेले आहे. सुट्टीला परत आलेले विद्यार्थी ऐन पी.एच.डी च्या मधेच भारतात अडकून राहिलेले आहेत. काही विषयांच्या कोन्फरंस आता दुस-या देशांमध्ये आयोजित केल्या जातात. कारण मान्यवरांना व्हिसा मिळून वेळेत पोहोचायची हमी देत येत नाही.
कित्येक युरोपियन देशांच्या नागरिकांना विना व्हिसा ३ महिन्यापर्यंत अमेरिकेत राहता येते. यात असे बरेच देश आहेत जिथे त्याच देशातील नागरिकांनी आतंकवादी हल्ले केलेले आहेत (उदा. ब्रिटन, फ्रांस). अशा देशांतील लोक कधीही विमानात बसून कुठल्याही तपासणीशिवाय अमेरिकेत दाखल होऊ शकतात. मध्यंतरी अशा एका ब्रिटीश नागरिकाच्या बुटात स्फोटक पदार्थ सापडले होते (तेव्हापासून एयरपोर्टवर बूट काढायचा नियम निघाला). या नियमांमध्ये तुमचं नाव जर इस्लामिक वाटत असेल तर तुम्हाला जास्त वेळ थांबावे लागते. ब्रिटीश पासपोर्टवर जन्माला आलेले असे किती इस्लामिक नावाचे लोक असतील? फ्रांसमध्ये कित्येक अरबी लोक वर्षानुवर्षं स्थाईक झालेले आहेत. त्यांचा फ्रेंच पासपोर्ट त्यांना विना इंटरव्यू अमेरिकेत येऊ देतो. पण अरबी देशातून आलेल्या अरबी लोकांना कित्येक महिने थांबावे लागते. २२१ मधून जसे तपासणी नंतर माझ्यासारखे लोक सुटतात तसेच कित्येक पाकिस्तानी, अरबी, चीनी लोकही सुटतात. पण ज्यांची काहीच तपासणी होत नाही त्या लोकांमध्ये एखादा आतंकवादी नसेल असे कशावरून?
मला अमेरिकेत पोस्ट डॉक मिळाल्यावर पुन्हा त्या प्रक्रियेतून जावं लागणार याचा विचार करूनच अंगावर काटा आला. दुसऱ्यावेळी देखील चार आठवडे लागले आणि व्हिसा ऑफिसरनी, "You are smart and single. what if you find yourself an American husband? You are just paying the price of being so smart." असा शेरा मारला होता. पोस्ट डॉक चे काही महिने संपल्यावर मी हा व्हिसा रिन्यू करायचा नाही हे पक्कं ठरवलं होतं.
अमेरीकेनी ही प्रक्रिया आमच्यासारख्यांसाठी सुखद करावी असं माझं अजिबात मत नाही. त्यांनी त्याच्या देशात कुणाला थारा द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. आणि अमेरिकन नागरिकांचं संरक्षण करण्याचे सगळे मार्ग त्यांनी वापरले पाहिजेतच. त्यात आमच्यासारख्या लोकांची गैरसोय होणे ही तशी छोटी बाब आहे.अमेरिकेतील वास्तव्यात मला स्वत:बद्दल आणि माझ्या कामाबद्दल खूप काही शिकायला मिळालं आहे. आपण तिथे उगीच गेलो असं मला अजिबात वाटत नाही. पण आपण उगीच परत आलो असंही वाटत नाही.
खरं सांगायचं तर मला परदेशात राहून फेसबुकवर किंवा ट्विटर वर "भारतातील राजकारण, भारतातील अत्याचार, भारतातील भ्रष्टाचारावर मतं व्यक्त करायची हळू हळू लाज वाटू लागली होती. मी अमेरिकेत राहून अमेरिकेच्या राजकारणाचा अभ्यास करायचे पण तिथे मला नेता निवडता यायचा नाही. आणि भारतातील राजकारणाचा उहापोह करून, फेसबुकवर मित्रांशी वाद घालताना त्यांच्यावर लिंका फेकून, खूप सारा दंगा करूनही मला भारतात मतदान करणं जमेलच याचीही खात्री नव्हती. मग आपण नुसतेच पेपर टायगर आहोत असं वाटू लागलं होतं. आणि अशी आयुष्यभर नोकरी करत करत कदाचित आपल्यातली ही टोचणारी सुई बोथट होईल याचीही काळजी वाटू लागली होती.
माझी निर्णय प्रक्रियेचा ढाचा "आधी ठरवा मग विचार करा" हा आहे. माझे सगळे निर्णय नेहमी असे एखाद्या सकाळी, अचानक उद्भवतात. त्यामुळे हा निर्णय झाल्यावर जवळपास आठ महिने माझी नोकरी बाकी होती. त्या काळात मी खूप लोकांशी बोलले. काही तिथे राहणाऱ्या काही परत आलेल्या, काही तिथलं नागरिकत्व मिळवलेल्या, माझे अमेरिकन आणि युरोपियन मित्र मैत्रिणी. काही लोक माझा आदर्श बनले. त्यातलीच एक गायत्री नातू. मला तिचं नाव आवर्जून घ्यावासं वाटतं कारण माझ्यासारखा लेख बिख लिहायच्या भानगडीतही ती कधी पडली नाही. तिचा निर्णय सुरवातीपासूनच पक्का होता. आणि नुकतंच तिचं प्रसाद बोकीलशी लग्न झालं. त्या लग्नाची गोष्ट तर म.टानी देखील उचलून धरली. तिच्या लग्नाचा एक छोटा भाग बनल्याचा मला अभिमान आहे.
परत येताना मला दिल्या गेलेल्या सल्ल्यांमध्ये पुन्हा व्हिसा ऑफिसरचाच मुद्दा निघाला -- लग्नाचा. भारतात जाऊन तुझ्यासारख्या उच्च शिक्षित, जग बघितलेल्या मुलीसाठी नवरा शोधणं अवघड आहे. अर्थात, हा प्रश्न वयक्तिक आहे. आणि खूप दिवस मी त्यावर ठरवून लिहिलेलं नाही. पण परत येऊन तीन महिने झाल्यावर माझे याबद्दलचे विचार अजून ठाम झाले आहेत. एखाद्या देशात जाताना किंवा तिथून परत येताना दोन्हीवेळी हा लग्नाचा प्रश्न का उपस्थित व्हावा? लग्न होणार नाही, हा आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या निर्णयातील अडसर का व्हावा? आणि नाही झालं तर असा कोणता मोठा गहजब होणार आहे? हे आवर्जून लिहायचं कारण असं की मी खूप वर्षं या "सामाजिक अपेक्षेच्या" ओझ्याखाली राहून माझ्या आयुष्याला वेसण घालण्याचा प्रयत्न केला. आणि माझी खात्री आहे की माझ्यासारख्या इतर मुलीदेखील "आपलं लग्न झालं नाही तर?" या भीतीपोटी त्यांच्या आयुष्यातील काही निर्णय पुढे ढकलत असतील किंवा रद्द करत असतील. अर्थात इथे पुन्हा विरोध लग्न करण्याला नाही. पण न मिळालेल्या जोडीदारासाठी हातात असलेलं उच्च शिक्षण, नोकरी, प्रवास करायची संधी दवडणंदेखील बरोबर वाटत नाही. आणि ही भीती फक्त भारतीय मुलींची नाही हे ही लक्षात आलं. ही सगळ्या देशांतील मुलींना सतावणारी भीती आहे. पण भारतात परत येण्याच्या निर्णयातील सगळ्यात समाधानाची बाजू ही, की अशी भीती, काळजी पोटात असतानाही मी परत येऊ शकले. आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय माझ्या आई बाबांचे आहे. त्यांनी माझ्या प्रत्येक प्रवासात माझी पूर्ण साथ दिली आहे. आणि या बाबतीतही कुठल्याही प्रकारची चिंता, चिडचिड, दु:ख, असंतोष कधीही व्यक्त केलेला नाही. माझा परत येण्याचा निर्णय पूर्णपणे माझा होता. अर्थात आई बाबांना त्याचा प्रचंड आनंद झाला. पण मी नसल्याची त्यांना खंत होती हे त्यांनी मला कधीही दाखवून दिले नाही.
इतरही खूप छोटी छोटी करणे आहेत. जसं की, रविवारी फुले मंडईत जाणे, हक्काची बेकारी उपभोगणे, रिक्षातून फिरणे, रोज सकाळी अंजीर खाता येणे, माझ्या भाचरांचे लाड करता येणे. पण सगळ्यात महत्वाचं कारण हेच की मला भारतात परत यायचं होतं आणि माझ्या डोक्यात कोण्या एका शनिवार सकाळी लक्ख प्रकाश घेउन आलेला तो विचार कधीच कमजोर झाला नाही.
सई छान लिहीलंयस. काही काही
सई छान लिहीलंयस. काही काही गोष्टी थोड्याफार रिलेट करू शकले म्हणून लेख जास्तच आवडला.
<<< रविवारी फुले मंडईत जाणे, हक्काची बेकारी उपभोगणे, रिक्षातून फिरणे, रोज सकाळी अंजीर खाता येणे, माझ्या भाचरांचे लाड करता येणे.>>>> +१. मी अगदी समजू शकते.
सई, मस्त लिहिलेस. आवडलेच
सई, मस्त लिहिलेस. आवडलेच
@ वैद्यबुवा हे.मा.शे.पो
@ वैद्यबुवा
हे.मा.शे.पो म्हणजे काय?
हे माझे शेवटचे पोस्ट. हे
हे माझे शेवटचे पोस्ट.

हे सांगायला म्हणून शप्पत तोडली बरं.
म्हणजे "हे माझे शेवटचे पोस्ट"
म्हणजे "हे माझे शेवटचे पोस्ट"
घ्या! बुवा, तुम्हाला शप्पत तोडायला लागू नये म्हणून मी सांगितलं तर...! जौद्या!
LOL! Thank you.
LOL! Thank you.
आवडलं,छान प्रामाणि़क लिहिलय.
आवडलं,छान प्रामाणि़क लिहिलय.
मस्त लिहिलय.
मस्त लिहिलय.
वेल्कम बॅक! इतकेच म्हणतो.
वेल्कम बॅक!
इतकेच म्हणतो.
गंभीर समीक्षक | 18 February,
गंभीर समीक्षक | 18 February, 2013 - 11:30
गंस यांच्या वरील मुद्याशी सहमत.
मुक्तपिठीय प्रतिसादांच्या प्रतिक्षेत...
मुक्तपिठीय प्रतिसादांच्या
मुक्तपिठीय प्रतिसादांच्या प्रतिक्षेत... स्मित
<<
म्हंजे ब्र\म्हे आन त्यांची लूना प्लस त्या पावस्कर बाई का?
प्रतिसादक राज आभारी आहोत
प्रतिसादक राज
आभारी आहोत
छान , प्रांजळ लिहीलयं. मृ +१
छान , प्रांजळ लिहीलयं.
मृ +१
आलात का परत? वा वा. बरे झाले.
आलात का परत?
वा वा.
बरे झाले.
धन्यवाद या लेखाबद्दल
देस पराया छोडके आजा
पंछी पिंजडा तोडके आजा
आजा उम्र बहुत है छोटी
अपने घरमे भी है रोटी
सुंदर लेख आहे. एकदम प्रामाणिक
सुंदर लेख आहे. एकदम प्रामाणिक वाटला. निर्णयाबद्दल अभिनंदन सई आणि शुभेच्छा!
सई, परत येण्याचा निर्णय
सई,
परत येण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन. (आम्ही जवळपास २.५ वर्षापुर्वी आलो).
पण जर तुम्ही अमेरिकन विसा/इमिग्रेशन प्रक्रियेला कंटाळुन जर निर्णय घेतला असेल तर थोडा आणखी पेशन्स ठेवायला हवा होता असे मला वाटते.
मी आणि पत्नीने नागरिकत्वासाठी एका वेळी अर्ज केला होता. तिला नागरिकत्व लगेच मिळाले आणि माझा अर्ज एफ बी आय च्या "नेम चेक" नावाच्या प्रक्रियेत २.५ वर्षे अडकला होता त्यामुळे मला नागरिकत्व मिळायला तेवढा वेळ जास्त लागला.
माझ्या सासु सासर्यांचा विसा २ वेळा रिजेक्ट झाला होता..
बहिणीचा विसा ही २ वेळा रिजेक्ट झाला होता.आणि असा सगळा अनुभव असुनही "अमेरिकन विसा" ची प्रक्रिया ही न्याय्य आहे असेच मी म्हणेन. तिथले लोक अतिशय काटेकोरपणे आपले काम करतात आणि त्यांची प्रोसेस फॉलो करतात. त्यामुळे काही वेळा जास्त वेळ लागतही असेल पण जर केस सरळसोट असेल तर शक्यतो काही प्रॉब्लेम येत नाहीत असा माझा आणि ओळखीच्यांचाही अनुभव आहे.
दुसरा मुद्दा: परत येताना सगळी कागदपत्रे-आय-९४ इ. वॅलिड होते का? शक्यतो वॅलिड असलेले चांगले. कारण आता जरी तुम्ही परत आला असाल तरी भविष्यात नोकरी लागल्यावर तुम्हाला कॉन्फरन्स किंवा शॉर्ट ट्रिप इ. साठी परत जावे लागेल तेव्हा काही प्रॉब्लेम येणार नाहीत.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
पण कोण आहेत हे गं.स ? >>> सई
पण कोण आहेत हे गं.स ? >>> सई , वर बेफिकीरने प्रतिसाद दिलाय ना , त्यांचा गंभीर समीक्षक हा डु आयडी आहे.
अरे वा!!!!!! सई, खुप दिवसांनी
अरे वा!!!!!! सई, खुप दिवसांनी दिसलीस!
अगदी प्रांजळ लेख! तुला अनेक शुभेच्छा!
अवांतर, कालच आमच्याकडे भारतातुन एक मुलगी आली आहे. इथे शिकण्यासाठी. काल तिनेही हेच सांगितले की अमेरिकेत जायला व्हिसा मिळवणे फार त्रासाचे जाते. एव्हढ्यात अनेकांचा व्हिसा रिजेक्ट झाला वगैरे. त्यामुळे तिने आणि तिच्या ५-७ मित्र-मैत्रीणींनी इथे येण्याचा निर्णय घेतला.
@श्री, एकदम भांडाफोड कर दिया तुमने तो!
अरे सई,किती दिवसांनी आलीस
अरे सई,किती दिवसांनी आलीस इथे..आवडला तुझा लेख.. प्रामाणिक वाटला..

आणी तो विडिओ??? It's really stupid and Hilarious!!
प्रामाणिक लेख! भारतात किंवा
प्रामाणिक लेख! भारतात किंवा जगाच्या पाठीवर कुठेही तुझ्या मनासारखी नोकरी मिळण्यासाठी शुभेच्छा! हक्काची बेकारी उपभोगणे म्हणजे नक्की काय??? "दोन वेळा स्वताला खायला घालू शकेन एवढे पैसे असतील तर वाटेल तेव्हा नोकरी सोडून घरी बसेन आणि कोणी मला देशाबाहेर काढले नाही पाहिजे. बाकी रस्त्यावरची वीज इ इ सामाजिक सुविधा बाकीच्या लोकांच्या Tax मध्ये होऊ दे " अस वागणे का??
@श्री अय्या ! एका न
@श्री
अय्या ! एका न आवडलेल्या लेखावर दोन आयडी वापरून दोन विरुद्ध प्रतिक्रिया का द्याव्यात?
मायबोली ट्रोल आहेत का बेफिकीर?
@सीमंतिनी

हो हो. तशीच बेकारी.
पण थोडेच दिवस. आता लगेच भरणारे हो tax मी पण!
मस्त लिहिलं आहेस सई. आवडलं.
मस्त लिहिलं आहेस सई. आवडलं. प्रत्येकाची परत यायची कारणं वैयक्तिक असतात हे खरंच.
पण थोडेच दिवस. आता लगेच
पण थोडेच दिवस. आता लगेच भरणारे हो tax मी पण! >>
मस्त!!!
खरं सांगायचं तर मला परदेशात
खरं सांगायचं तर मला परदेशात राहून फेसबुकवर किंवा ट्विटर वर "भारतातील राजकारण, भारतातील अत्याचार, भारतातील भ्रष्टाचारावर मतं व्यक्त करायची हळू हळू लाज वाटू लागली होती. मी अमेरिकेत राहून अमेरिकेच्या राजकारणाचा अभ्यास करायचे पण तिथे मला नेता निवडता यायचा नाही. आणि भारतातील राजकारणाचा उहापोह करून, फेसबुकवर मित्रांशी वाद घालताना त्यांच्यावर लिंका फेकून, खूप सारा दंगा करूनही मला भारतात मतदान करणं जमेलच याचीही खात्री नव्हती. मग आपण नुसतेच पेपर टायगर आहोत असं वाटू लागलं होतं. आणि अशी आयुष्यभर नोकरी करत करत कदाचित आपल्यातली ही टोचणारी सुई बोथट होईल याचीही काळजी वाटू लागली होती. >> वाह! +१
लेख आवडला. प्रामाणिक आणि फार बाऊ न करणारी स्वच्छ मतं आहेत.
मायबोली ट्रोल >> बाकी काही असो, ही संज्ञा आवडली.
@ मानस्मी मी वरती एका कॉ
@ मानस्मी
मी वरती एका कॉ मेंटमध्ये लिहिल्या प्रमाणे अमेरिकेचे नियम काही ठराविक देशांसाठीच खूप जास्ती जाचक आहेत. आणि आतंकवादी व्हिसा वेव्हर असलेल्या देशांतून येऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. व्हिसा वेव्हर असलेलेल्या देशातांतील (ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, फ्रांस इत्यादी) नागरिकांना इम्बासित न जाता तीन महिन्यापर्यंत अमेरिकेत येता येतं. त्यात या शाखेतील शिक्षण घेतलेले कित्येक लोक असतात. आणि त्यांच्यातही आतंकवादी असू शकतात. एका ग्रूप मधल्या लोकांची कसून तपासणी आणि दुस-या ग्रूपला नुसत्या पासपोर्ट वर एन्ट्री हे सुरक्षेच्या दृष्टीतून पटत नाही.
फारच घोळ घातलाय. "का आलात" ला
फारच घोळ घातलाय. "का आलात" ला "यायचं होतं" एवढं पुरे आहे. पण ते उत्तर आहे का नाही कळत नाही कारण व्हिसा प्रोसेस बद्दल तक्रार केलेली आहे. बाकी राजकारण आणि शेवट्च्या इतर लहानसहान गोष्टीही आहेत. मध्येच लग्नाचं काहीतरी..
त्या शेरा मारलेल्या व्हिसा ऑफिसरने व्हिसा दिला ना?(असा माझा समज झाला) मग आडकाठी कोणी केली?
>> पण माझ्या देशात काम करायला किंवा न करायला मला असली कुठलीही कागदपत्र लागत नाहीत-म्हणजे फक्त व्हिसा, बाकी कागदपत्रं लागतातच.
माझं लग्न झालंय की नाही हे विचारायला मला कुणीही येत नाही -रिअली?
आणि मी लग्नाचा वापर करून नागरीकत्व मिळवीन अशी भीती वाटून मला इथे कुणीही अडकाठी करत नाही. तिथले नागरीक आहात म्हणून, पण त्या नागरीकत्वाचा पुरावा लागतोच ना कुठेतरी.
अडकाठी करत नाही.आणि तशी केलीच तर मला "नको तुमची नोकरी" म्हणायचं भारतात जास्ती स्वातंत्र्य आहे. - ते कसं काय?
>>माझी निर्णय प्रक्रियेचा ढाचा "आधी ठरवा मग विचार करा" हा आहे
ह्म्म.. म्हणजे आधी जायचं ठरवून मग ही कारणं दिसली आहेत का?
>भारतात जाऊन तुझ्यासारख्या उच्च शिक्षित, जग बघितलेल्या मुलीसाठी नवरा शोधणं अवघड आहे.
..
यानंतरचा पॅरा म्हणजे वरचे वाक्य खरेच आहे हे गृहित धरुन लिहिलाय. एवढी चणचण आहे तिकडे उच्चशिक्षित मुलांची??
बाकी अमेरिकनांनाही त्या युरोपियन देशांत व्हिसाशिवाय काही दिवस्/महिने रहाता येते. तो देशांमधला करार आहे. तसा भारत- अमेरिका करार होऊदे म्हणजे सोपं होईल दोन्हीकडच्या लोकांना.
@लोला व्हिसा बद्दलची
@लोला
व्हिसा बद्दलची "तक्रार" नीट व्यक्त झाली नव्हती. त्यात सुधारणा केली आहे.
करार असला तरी २२१ हा फक्त सुरक्षेसाठी केलेला नियम आहे. त्यामुळे तिथे व्हिसा वेव्हर वाल्या लोकांना न तपासताच एन्ट्री दिली तर सुरक्षा कशी?
अशा देशांतील लोक कधीही
अशा देशांतील लोक कधीही विमानात बसून कुठल्याही तपासणीशिवाय अमेरिकेत दाखल होऊ शकतात.
>>त्यामुळे तिथे व्हिसा वेव्हर वाल्या लोकांना न तपासताच एन्ट्री दिली तर सुरक्षा कशी?
"कुठल्याही तपासणीशिवाय, न तपासताच " हे खात्रीने सांगू शकतेस? केस बाय केस बेसिसवर असू शकते. त्या ठराविक देशांतल्या लोकांचे प्रोसेसिंग फास्ट होत असेल. शू बॉम्बरची गोष्ट २००१ मधलीच आहे. ९११ नंतर लगेचच. आता काहीही "न तपासता" होत नाही एवढे नक्की.
ज्यांना यायचंय त्यांनी या परत
ज्यांना यायचंय त्यांनी या परत
आणि इथे राहून "राहू का जाऊ" भिजत घोंगडं ठेवलंय त्यांनीही रहायचं ठरवून नागरीकत्त्व घ्या. नाहीतर कुंपणावरुन उड्या मारुन येणारे लोक बामाकृपेने रांगेत तुमच्या आधी उभे असतील. 
एयरपोर्ट वर होते तेवढीच
एयरपोर्ट वर होते तेवढीच तपासणी असते. त्या व्यतिरिक्त त्यांना फक्त एक फॉर्म भरावा लागतो जो त्यांच्या आगमनाच्या आधी पडताळला जात नाही. आणि मुख्य म्हणजे त्यांचा कधीही फेस टु फेस इंटरव्यू होत नाही. कस्टम मध्ये होतो तोच पहिला.
मला हे खात्रीशीर माहिती आहे कारण मी माझ्या फ्रेंच मैत्रिणीबरोबर प्रवास केला आहे. माझे पी. एच. डी गाईड ऑस्ट्रेलीयन आहेत आणि माझ्या ओळखीचे कित्येक फ्रेंच/जर्मन लोक आहेत. हे "करार" दोन देशांमध्ये सुरेक्षे व्यतिरिक्त कितीतरी कारणांनी होतात. आणि भारत आणि चायना बरोबर अमेरिका असा करार कधीही करणार नाही. यात अजून एक कारण असं देतात की ज्या देशांनी न्यूक्लिअर वेपन्स तयार केलेत त्यांना जाचक अटी आहेत. पण त्या बाबतीत वेव्हर वाले सगळे देश आधीच आपल्या पुढे आहेत.
Pages