'मी' चे 'आम्ही' व्हायला किती वेळ लागतो?

Submitted by चिखलु on 18 February, 2013 - 10:15

'मी' चे आम्ही व्हायला किती वेळ लागतो? याची प्रेरणा काय असावी? अशी काय रेसिपी आहे जी मी तुन आम्ही बनवते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अख्ख्या मायबोलीला का वेठीस धरता?

इथे संपर्क साधा की राव.

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

बीबीसी च्या डॉक्यूमेंटरीच्या संदर्भाने आपल्या शरीरावर आणि शरीरातदेखील सदोदीत अब्जावधी बॅक्टेरिया असतात... त्यामूळे प्रत्येकजण स्वतःला, आम्ही असे म्हणू शकतो.. सर्वांनी आपल्याला तसे(च) म्हणावे, हा थोडा अट्टहास झाला.

शीर्षकात ढोबळ गल्लत आहे असे माझे मत आहे. मीपणा आल्यानंतर मी चे आम्ही होते असे मला वाटायचे.

हायला.... खरंच की. आता शीर्षक असं ठेवा.

मी पणा येउन आम्ही व्हायला किती वेळ लागतो?

लग्न व्हायच्या आधी मी असतो दुसर्‍यादिवशी आम्ही बनतो >>>>>श्री...हे काय्....मधे काही ' दिवस जावे ' लागतात ना....सोप्पय....:)

कवी काक,

माबोच्या गझलेतील प्रत्येक धाग्याला काकस्पर्श व्हावा ही तर श्रींची इच्छा होय!

पण इतर धाग्यांना काकस्पर्श झाल्यास ते धागे पिंडात रुपांतरीत होवून त्यांना अकराव्याचे कुलुप लागेल याचे ध्यान असो!

कळावे

गं स

श्री...हे काय्....मधे काही ' दिवस जावे ' लागतात ना....सोप्पय....<<<

स्वयंपादाधिष्ठित दोसाउदर्निर्वाहीत माबोकर नाना, दोघे म्हणजेही आम्हीच, फक्त तिघे म्हणजे आम्ही नव्हे

कसंय चिखल्या भौ,

आधी जलमल्यावर 'मी' कोण ते ठावं नस्तंय. मंग ते न्हानं चिख्लू बाळ 'चिख्लूला भूक लाग्ली' किंवा 'चिख्लूला शू आली' असं थर्ड पर्सनमधे बोलतं. (फुडं विंग्रजी मेडीयम्ला घातलं तं मोटं झाल्यावरबी तसंच बोल्तं ते अल्लग.)
मंग नंतर समज याया लाग्ती, तसं वयाच्या ४थ्या वर्शी च्या आसपास 'इड'(id) अन 'इगो'(ego) डेव्लप होतात. मंग ते बाळ 'मी' म्हणाया लाग्तं.

मंग मोठं हुतं.

आजून मोठं हुतं.

आजूऽन मोट्टठं हुतं.

त्याला वाटाया लाग्तं. मी लै भारी. मला सग्ळं येतं. आसं झालं, की ते बाळ सोताला 'आम्ही' म्हणाया लाग्तं. आता हितं उलीशी गोची अस्ते. बाळ पन सोताला आम्ही म्हंतंय. आन बाळाचं टीकाकार बी त्येच म्हंतंय Wink त्या बाळाची समीक्षा करतानी त्याला हिणून दाख्वाया धाउ धाऊ जानारी बी पब्लीक अस्तीच, तशीच समीक्षा वाल्याला मी चा आम्ही वाटाया लावनारी पब्लीक बी अस्तीच. रिक्काम्या भजनकर्‍यांची कमतर्ता भार्तात न्हाई. आता, हितं, हे बाळ आन त्याचं समीक्षक मिळून दोघंबी 'आम्ही' बनून गिर्क्या मारत र्‍हातात..

पन बाळानं सम्जा गिर्क्या नै मार्ल्या, तं मंग ते बाळ आऽऽऽजून मोठ्ठं हुतं, आन मंग त्याले उमजतं. का म्या आन तो इट्टल येकच. म्या आन तो समीक्षक बी येकच. अहं ब्रह्मास्मी! आन आख्खं ब्रह्मांड येकच म्हना, का अनेक म्हना! अंडं म्हन्लं का येक पेशी. आन ब्रह्म म्हन्लं का अब्जो व्यक्ती!. मंग सग्ळं मिळून हुतो तो 'आम्ही'

आसं झालं, तं मंग बाळाने ट्यां क्येलं तं खाली समीक्षक येत नै, आन बाळ बी आर्डा वर्डा करीत नै.

तवा,

जर तुमचा प्रश्न नीट वाचला, तर - कुणाचा मीपणा गेला, अन कुणाला त्याचा मीपणा खुपला, या संदर्भांनाच खरे महत्व आहे.

प्रश्नापेक्षा प्रश्नकर्ता अन उत्तर देणारी/असलेली व्यक्ती हेच महत्वाचे असलेल्या प्रश्नास 'लोडेड' प्रश्न म्हणतात. तुमचा प्रश्न 'लोडेड' आहे काय?

रच्याकने : माबोवर/मसंवर कुणालाही तू ऐवजी तुम्ही म्हणावे असा संकेत असल्याने प्रत्येकच टिनपॉट 'मी' ला स्वतः 'आम्ही' असल्याचा भास होऊ शकतो.

जर तुमचा प्रश्न नीट वाचला, तर - कुणाचा मीपणा गेला, अन कुणाला त्याचा मीपणा खुपला, या संदर्भांनाच खरे महत्व आहे.

प्रश्नापेक्षा प्रश्नकर्ता अन उत्तर देणारी/असलेली व्यक्ती हेच महत्वाचे असलेल्या प्रश्नास 'लोडेड' प्रश्न म्हणतात. तुमचा प्रश्न 'लोडेड' आहे काय?
>>> प्रश्न 'लोडेड' नाही. या प्रश्नाला कुठलाही/कुणाचाही संदर्भ नाही. पण कुणाला लावायचाच असेल तर मग त्याची/तिची इच्छा.

मस्त धागा एकापेक्षा एक प्रतिसाद

अभिनंदन चिखलूदादा व धन्यवादही
बाकी माझा एक शेर आठवला

जो नव्हता माझ्यामध्ये तो अहंकार बाणवला
मी काय चीज आहे ते बघण्याचे धाडस केले

Happy

सेन्चुरी पायजेल राव!!..... >>>>>>>>>>> अनुमोदन !!

स्वानुभवावरून सांगतो, एक महिना एक दिवसांपूर्वी मी 'मी' होतो, एका महिन्यापूर्वी 'आम्ही' झालो Wink

चिखल्या,
'मी' चे 'आम्ही' व्हायला किती वेळ लागतो?
हा प्रश्न खुपच रिलेटीव्ह आहे. कशाच्या आणि कुणाच्या संदर्भात तुम्ही हा प्रश्न विचारत आहात हयावर उत्तर अवलंबून आहे. म्हणजे नवरा-बायको नात्यात मी चे आम्ही होणं की एखाद्या कुटुंबाचा (कम्युनिटी अशा अर्थी) भाग म्हणून मी चे आम्ही होणं अशा अर्थी.
ही एक प्रोसेस आहे आणि Interpersonal Relationships आणि एकमेकांवरील विश्वास ह्या दोन गोष्टी ह्या प्रोसेसच्या अविभाज्य भाग आहेत.

'मी' चे 'आम्ही' व्हायला किती वेळ लागतो? >>> क्षणही पुरतो... ज्या क्षणी तुमचा "मी" होतो.. तेव्हा स्वतःला "आम्ही" संबोधतात.. आणी लोक "तुम्ही" चा "तू" करतात.

स्वयंपादाधिष्ठित दोसाउदर्निर्वाहीत माबोकर नाना >>>>>> Happy गंभीर समीक्>>> बरं बाबा....

जेमतेम एक सेकंद Happy
तुमच्या बरोबर असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा विचार जेव्हा तुमच्या मनात असतो (घरातले, मित्र, नातेवाईक, इ.) तेव्हाच "मी" चा "आम्ही" झालेला असतो अगदी नकळत.

ज्या वेळी माणसाच्या " मी" ची ,अहंकाराची भावना "आपले पणा" घेईल त्यावेळी मी चा आम्ही होईल

(संदर्भानुसार वेळ आणि अर्थं

(संदर्भानुसार वेळ आणि अर्थं बदलेल.)
एक क्षण! हे माझं उत्तर आहे.
तुमच्या अहंकाराच्या बुडबुड्याची त्रिज्या ज्याक्षणी तुमच्या मेंदूपेक्षा मोठी होते, त्या क्षणी! स्वीच ऑन होतो Happy
शिवरायांसारख्यांना ही व्याख्या लागू नाही. असामान्यं व्यक्तीमत्वं स्वत:च्या व्याख्या घडवत असतात. ते जन्मलेच मुळात "आम्ही" म्हणूनच!
बाकी... दुसर्‍या जीवाची नुक्ती चाहूल लागलेली कुणी... तिचंही मी चं आम्ही एका क्षणातच होतं. प्रेमात पडलेल्याचीही हीच कथा.

तुमच्या अहंकाराच्या बुडबुड्याची त्रिज्या ज्याक्षणी तुमच्या मेंदूपेक्षा मोठी होते, त्या क्षणी! स्वीच ऑन होतो >>> वाह दाद !

व्वा दाद !
दुसर्‍या जीवाची नुक्ती चाहूल लागलेली कुणी... तिचंही मी चं आम्ही एका क्षणातच होतं. प्रेमात पडलेल्याचीही हीच कथा.

परचक्र आल्यावर भारतीयांच्या संकुचित मी चा आम्ही होतो असेही वाटतेय..

18 February, 2013 - 20:45

18 February, 2013 - 20:59
इथ एवढाच लागलाय................

18 February, 2013 - 20:45

18 February, 2013 - 20:59
इथ एवढाच लागलाय.............
>>>
दादाश्री असे कोड्यात बोलु नका राव, संदर्भासहित स्पष्टीकरण दिले तर बरं