स्वप्नात काल माझ्या येऊन कोण गेले?

Submitted by सतीश देवपूरकर on 18 February, 2013 - 07:37

गझल
स्वप्नात काल माझ्या येऊन कोण गेले?
हुरहूर काळजाला लावून कोण गेले?

हा गंध भोवताली रेंगाळतो कुणाचा?
श्वासात फूल माझ्या पेरून कोण गेले?

कोमेजलो, उमललो, कोणास काय त्याचे?
मी रानफूल! माझ्या जवळून कोण गेले?

काळोख लख्ख दिसतो किरणांत नाहलेला;
येथे विजेप्रमाणे चमकून कोण गेले?

आकाश तारकांचे का वाटते रिकामे?
नाही कुणास कळले निखळून कोण गेले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रानफुलाचा शेर मागेही एकदा एका गझलेत्र अस्साच आला होता बहुधा.... ही "रानफुले"त्ली तीच गझलच पुढे वाढवलेली आहे काय
असो
नेहमीनेहमीसारखीच वाटली
रानफुले रातराणी निशिगंध या विशयीचे काही तुमचे शेर मला खूप आवडले आहेत आजवर पण नेमके आठवत नाहीत खास्करून त्यासोबत वारा झुळूक गंध असे असलेले ते शेर होते एकात हा वारा मागील दारात येतो असा काहीसा उल्लेख होता तो शेर जाम आवडलेला
असो

हा गंध भोवताली रेंगाळतो कुणाचा?
श्वासात फूल माझ्या पेरून कोण गेले?

आणि

काळोख लख्ख दिसतो किरणांत नाहलेला;
येथे विजेप्रमाणे चमकून कोण गेले?

हे दोन्ही शेर एकाच वृत्तात आहे का?

सर्व मुद्रित व हास्यमुद्रात्मक प्रतिसादकांचे आभार!
गझल 'रानफुलेतील' आहे!

गजलुमिया!
कुणाचा हा गंध माझ्या भोवताली रेंगाळतो आहे, असे उला मिस-यात म्हटले आहे!
रेंगाळण्यात मागे राहण्याची/घुटमळण्याची/मागे अस्तित्वात उरण्याची भावना दडली आहे!
गंध आहे म्हणून सानी मिस-यात फूल आले!
इथे फूल , गंध, श्वासात फूल पेरणे, भोवताली गंधाचे रेंगाळणे ही झाली प्रतिकांची काव्यात्मक भाषा!
शेराचा सूचीत/ध्वन्यार्थ असा आहे.....

एखादी व्यक्ती....मग ते वडील असतील, आई असेल, वा कोणतीही प्रीय व्यक्ती असेल, ती जेव्हा मरण पावते/जाते तेव्हा मागे आपला अंश म्हणजे मुले मागे ठेवून जाते! त्यांच्या रूपात ती व्यक्ती जणू मागे जिवंतच अस्तित्वात राहते!
जणू जाणारी व्यक्ती तिलाच स्वत:ला पेरून पुढील प्रवासास गेलेली असते पण तरीही ती मुलांच्या रुपाने मागे राहतेच!
पेरण्यात उगवणे आले! बी/बीज पेरतात जे नाहिसे झाल्यागत होते पण वृक्षाच्या रुपाने ते उगवतेच ज्याला फुले, फळे लगडतात!
माझ्या श्वासात, म्हणजे माझ्या जीवनात, माझ्या अवती भवती जणू एक सुगंध दरवळत असतो!
तो गंध म्हणजेच आमच्यात पेरला गेलेला परमेश्वराचा/प्रिय व्यक्तीचा अंश ज्याच्या करता आम्ही फुलाची प्रतिमा निवडलेली आहे!

हा एक वाढत जाणारा, विस्तारत जाणारा गंध आहे! ते एक जाणा-या व्यक्तीचे मागे राहणे आहे!
आमच्या श्वासात /आमच्या जीवनात तो परमेश्वराचा/प्रेयसीचा अंशच आहे असे जणू सुचवले आहे! म्हणून आम्ही सानी मिस-यात म्हटले.....
श्वासात फूल माझ्या पेरून कोण गेले!

इथे सुगंधाची पेरणी असल्याने फूल पेरून गेले असे म्हटले आहे!
हा शेर मृत झालेल्या वडिलांना / आईला/ जाणा-या प्रेयसीला असा लावता यावा!
..................................................................

ताटात काल माझ्या जेऊन कोण गेले?
बोंबील वाळलेले शिजवून कोण गेले

आवाज भोवताली रेंगाळतो कुणाचा?
झोपेत कान माझे कोरून कोण गेले?

कोमेजलो, उमललो, गॅसास काय त्याचे?
या नासिकेस माझ्या जाळून कोण गेले?

काळोख लख्ख दिसतो नाल्यात नाहलेला;
टमरेलच्या प्रमाणे चमकून कोण गेले?

आकाश तारकांचे झाले जसे रिकामे
हे काफिये रदीफी ढकलून कोण गेले!

-कावळा

वा कावळेदादा वा !!!

टमरेलच्या प्रमाणे चमकून कोण गेले >>>>> Rofl ..... हासिले हझल !!!

अख्खी हझल जबरदस्त जमलीये .............. _____/\_____
(फक्त जाळून कोण गेले....मध्ये प्रतिमा आशय विषय तुमच्या हझलेत न्युमरसली रेपीटेड असल्याने जरा कमी आवडला)

या हझलेतले शेवटचे दोन शेर तस्वीर तरहीच्या हझलेत खपतील अस्सेच चपखल झालेत शेर क्र.२ (आड-पोहरा)व क्र. ५(तारका -रात्र्/काळो़ख) साठी Happy

कावळेदादा ...होवून जावुद्या एखादी तस्वीर तरही हझल २ शेर तयारच आहेत तर!!!

आकाश तारकांचे का वाटते रिकामे?
नाही कुणास कळले निखळून कोण गेले!

बरेच वर्षांनी आपण एक 'शेर' केलात म्हणून अभिनंदन कवी सतीश

कळावे

गं स

तो किडका दात वाला स्मायली खुप्पच वाईट आहे>>>>
तुमचे नाव सस्मित असल्याने व त्या स्माईलीचे कुस्मित असल्याने तुम्हाला तो आवडत नसावा !!!!
Lol

गिरिजाताई,
सर तुमच्या रचनांपेक्षा तुमच्या स्मायलीच भारी असतात

???????????

सस्मित,
तो किडका दात वाला स्मायली खुप्पच वाईट आहे<<<<<<<<<<<<<<

स्मायलीला द्रुष्ट लागू नये म्हणून ती पोकळी ठेवलेली आहे, तो किडका दात नव्हे!


(भयभीत)

सस्मित,
तो किडका दात वाला स्मायली खुप्पच वाईट आहे<<<<<<<<<<<<<<

स्मायलीला द्रुष्ट लागू नये म्हणून ती पोकळी ठेवलेली आहे, तो किडका दात नव्हे!


(भयभीत)

तुझ्याच करता ती मुद्रा होती!

सत्यवचन असल्याने शिंक येत आहे वरील मुद्रेला!

Pages