तस्वीर तरही : आर्त कोडे

Submitted by राजीव मासरूळकर on 18 February, 2013 - 06:01

हा एक छोटासा प्रयत्न आहे, आशय आणि चित्रांशी काफिया सुसंगत रहावा यासाठी थोडी तडजोड स्विकारली आहे. काही शब्दांवर आक्षेप येतील हे जाणूनही इथे प्रकाशित करतो आहे.

आर्त कोडे

वाकलेल्या जीर्ण झाडा रे , मला कुरवाळ थोडे
मन्मनी आभाळवेणांचे सुटू दे आर्त कोडे

पोहरा वठला तिरी आशाळभूतासारखा पण
लोचनांची विहिर कोरी अन् किनारेही सटोडे

हात सोडावा न वाटे का तरी सोडून जाशी ?
वाटते जातील उधळुन, डाव माझा, श्वासघोडे

नावडे मज धाक, शाळा मज हवी माणूसकीची
काय मी घेऊ भरारी जेथ गुरुही नाकतोडे

रंग गेले जीवनाचे, चव जरा ना राहिली रे,
घे मना नभकुंचला अन् वेच थोडे वेलदोडे

- राजीव मासरूळकर
दि १८.०२.१३
दु ४.०० वाजता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाकतोडे या शब्दातून थोडा रसभंग झाल्यासारखा वाटतोय.

वेलदोडेतूनही फारसं काही विशेष जाणवत नाही.

बघुया .

काफिया शरणता
अती चित्रदर्शीपणा त्यातही काफिये (यमकाचे शब्द ...एखाद्या कवितेतही वापरूनयेत असे झालेत गझलेत तर काय मग!!)

कल्पनेचे वारू शेराच्या सुरुवातीला उधळल्यासारखे वाटले खरे पण शेवटास लागेपर्यंत भरकटले असल्याचे लक्षात आले

..घोर निराशाबिराशा झाली असे काही वाटत नाही आहे पण जरा मूड गेलाच Happy

पुढील वेळी चांगली करालच अशी खात्री बाळगतो Happy चालेल ना मसरूळकर ?

अमुक एक शब्द कवितेत वापरावा, तमुक एक वापरू नये असे काहीही नसते हो. हा गैरसमज कृपया मनातून काढून टाका. तो शब्द आशयाला योग्य आहे की नाही इतके बघावे ( वै.म.)

प्रयत्न बराय.
नाकतोडे मधून काहीही रसभंग झालेला नाही. तुम्हालाही हे चांगलं माहिताय की हा शेर बहुपदरी आहे. चित्रातल्या शिकवणार्‍या बाई आहेत त्यामुळे समस्त स्त्री वर्गाला उद्देशून नाकतोडे म्हणायचे हा एक अर्थ आणि शिक्षक/ प्रोफेसर लोकं नाकतोडे असतात असं सुचवायचंय तुम्हाला हा दुसरा अर्थ. तुम्हाला काय वाटलं स्वतःहूनच स्वतःच्या रचनेला चांगली नाही म्हटले तर आम्हाला काय कळणार नाही का काय

वेलदोडेवर कुणी घेतलाच आक्षेप तर ठासून सांगा की वेलदोडा एक प्रतिक म्हणून आला आहे. ( कशाचं प्रतिक ते मात्र शेवटपर्यंत सांगायचं नाही )

अमुक एक शब्द कवितेत वापरावा, तमुक एक वापरू नये असे काहीही नसते हो. हा गैरसमज कृपया मनातून काढून टाका. तो शब्द आशयाला योग्य आहे की नाही इतके बघावे ( वै.म.)>>>
...............मला माहीत आहे ते गझलूमिया माझ्या बोलायची तीव्रता जास्त जाणवेल म्हणून वापरले तसे वाक्य .....असे वाटण्यात चूक झाली बहुधा त्यासाठी क्षमस्व Happy

आम्हाला काय कळणार नाही का काय... >>>> ....सहमत Wink
कशाचं प्रतिक ते मात्र शेवटपर्यंत सांगायचं नाही>>>....:हाहा:

Happy
सहमत !
दोघांचेही आभार.
प्रयत्न फसला आहे हे मला कळतेच आहे.

गझलुमिंया,
नाकतोडे या शब्दाचा समस्त स्त्रीवर्गाशी तुम्ही जोडलेला संबंध पूर्णतः चूक आहे. त्याबद्दल निषेध ! तुम्ही लावलेल्या या अर्थाशी फक्त तुमचा संबंध आहे. त्यात माझा काहीही दोष नाही.

मी एवढंच म्हणेन की मी फक्त भरारी घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि त्यांच्यापुढे तोकडे पडणारे शिक्षक यांच्या संबंधावर चित्राच्या निमित्ताने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

नावडे मज धाक, शाळा मज हवी माणूसकीची
काय मी घेऊ भरारी जेथ गुरुही नाकतोडे

रंग गेले जीवनाचे, चव जरा ना राहिली रे,
घे मना नभकुंचला अन् वेच थोडे वेलदोडे<<<

छान

महाभारतातील कुरुक्षेत्रात ऐन युद्धात अभिमन्यूनेही दोन चार शीरे आपल्या बाणांनी उडवून धुळीत माखववीत तशी गझल!

कळावे

गं स

गझल अतीशय कृत्रिम वाटली
.
....तसे गझल म्हणे कृत्रीमच काव्यप्रकार असतो (आपल्याला बुवा खरे खोटे माहीत नाही)...तरी मला वाटते की तो कृत्रिमपणा नैसर्गिकपेक्षाही नैसर्गिक करून दाखवण्यात शायराचे खरे कसब आहे

बघा या रचनेवर पुनर्संस्करण प्रयत्न करून एखादी छान गझल कधी अन कशी होवून गेली ते तुमच्याही लक्षात नाही यायचे............. खूप मजा येईल (या रचनेत एक चांगली गझल होण्याचे खूप पोटेन्शियल मलातरी दिसते आहे ...आणि एक चांगला गझलकार होण्याचे तुमच्यात !!..( वै. म.!!)

गं. स .
धन्यवाद !
अभिमन्यू आवडलं. तुम्ही कौरवांएवढं क्रुर बनू नका फक्त .

वैवकु ,
खरं आहे. वाचताना कृत्रिमता ठळकपणे पुढे येते. कवाफीच तसे आहेत.
तडजोड स्विकारली की जगणंही कृत्रिम वाटायला लागतं ना , तसंच या गझलेत झालं आहे.

पुन्हा वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल पुनःश्च आभार .

बेफिकीरजींचे,आवडते माझेही...काव्या मागच्या भावनाही विचारात घ्यायला हव्यात....
चालू राहू दे...पुलेशु...