घर

Submitted by आपटे सुरेखा on 17 February, 2013 - 08:48

क्षीण आशेनं बांधला
काडीमोडीचा कोसला
नाही कुणाचा हाकारा नाही कुणाचा दरारा
घरं माझं सुगरणी
हेलकावे व-यावरी
कुठे ठेवू दाणापाणी; कशी करू निगराणी?
चाळीमधी छोटी खोली
धुसफुसे लोटीवाटी
लोकं उगा डोकावती नाहीनही ते बोलती
घेता तीन खोल्यांचा महाल
गेले आयुष्य संपून
घुसमट येरझा-या, अंतरीच्या नाना कळा
वाळू शिमिटाचा बंगला
रक्त ओकून बांधला
गेली माणसे निघून वाट पाहे दुरून
जावे वाटे माळावर; माळावरल्या पालावर
पलीकडल्या तीरावर; कुणी नाही रे आपलं
जावे वाटे माळावर ; माळावरल्या पालावर
आज ठोकले उद्या काढले ;अस्तित्वाचे ठिपकेच पुसले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users