"सोनसळी"

Submitted by अमेय२८०८०७ on 17 February, 2013 - 03:39

सोनसळी तू गुलबकावली आकाशीची वीज गं
लाली लेऊन सांजसकाळी, दवासवे तू भीज गं

ओठातून या गीत यावे प्रेमस्वरांनी सूर न्हावे
तुझ्याचसाठी कोकीळराणी, गाते सुंदर चीज गं

स्पर्शास्तव हे झुकले तारे मृद्गंधाचे आले वारे
चंद्रकळांनी इथे मांडली, जरतारीची शेज गं

आनंदाची येते भरती पाऊसधारा नाचे वरती
सांगे हिरवळ लहरत काया, तारुण्याचे गूज गं

तू हसताना दैवी वाटे थकता बिंबही दुःखे दाटे
तव चिंतेने विश्व जागते, सायसुखाने नीज गं

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेय खूप सुरेख रचना. प्रत्येक कडव्याला अगदी अगदी म्हणावेसे वाट्ते आहे. तुमच्या परवानगीने लिहून घेते कविता.

धन्यवाद अंजली, शशांक, अश्विनी

कशी म्हणता ते ऐकवणार असाल तर लिहायला पूर्ण परवानगी आहे. (एरवीही आहेच हो).