विकत मी घेतो कळा

Submitted by सुशांत खुरसाले on 16 February, 2013 - 09:44

ना कळे हा कैफ कोठे घेउनी जातो मला
कापला गेला तरी गाणेच हा गातो गळा

मी उद्याच्याशी लढाया वीज रक्ती पोशितो
कीड सारी छाटण्याला शेत सोशीते झळा

सोबती नाही जगी या थोर दुःखासारखा
सुख दिसाया लागले की विकत मी घेतो कळा

चिंतिली करूणाच. त्याने अंतिच्या श्वासातही
राखुनी मांगल्य येशू साद घालीतो सुळा

'विजय होवो 'एवढीशी प्रार्थना नाही मुळी
तिलक हा तू लावलेला वाढवी तुझिया बळा

गात येतो शक्तिसुक्ते शांततेचा क्षण बघा
( त्यासवे अन् वादळाची शाश्वती देतो मला)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतला आणि 'येशू' हे शेर विशेष उल्लेखनीय वाटले.

"मी उद्याच्याशी लढाया वीज रक्ती पोशितो
कीड सारी छाटण्या उन्हात बघ न्हातो मळा" >>> यातील 'उद्याच्याशी' हा शब्द नीटसा ध्यानात आला नाही.
तुम्हाला 'उद्याशी' असे म्हणाय्चे आहे की आणखी काही ?
तसेच यातील दुसर्‍या मिसर्‍यात अडखळायला झाले.
'उन्हात' च्या मात्रा 'गा गा ल' अशा प्रकारे घेतल्या आहेत असे वाटते.
(उन्हात : लगाल)
--------------------------------------------------------------------------------------------------
चुकून रिपीट झालेल्या पोस्ट्स डिलीट करण्याची Admin ना कृपया विनंती करावी.
http://www.maayboli.com/user/3

उल्हासजी आणि टुनटुन, आभार!
उल्हासजी, दुवा दिल्याबद्दल विशेष. आभार..

दुसर्या शेरात 'उद्याशी' असेच म्हणायचे आहे.
तसेच 'उन्हात' मध्ये 'उ' वर 'न्हा' मुळे जोर पडतो असे मला वाटले.. त्यामुळे 'गा गा ल' असे पकडून लिहिले..
चूक असल्यास क्रुपया कळवावे..