उभी निष्पर्ण झाडागत (तस्वीर तरही)

Submitted by प्राजु on 16 February, 2013 - 05:16

उभी निष्पर्ण झाल्यागत पुन्हा मी या नदी काठी
किती वेळा इथे येऊ, तुला विसरावयासाठी?

कधीचा गाळ आडाच्या नशीबी साचला आहे
उडी घेईल का तो पोहरा उपसावयासाठी?

सुटूदे हात हातातून पण तू जाण रे सखया
असे संपेल ना नाते, अशा सुटणार ना गाठी

कुठे गेली जुनी शाळा, फ़ळा काळा नि बाई त्या?
मला काळा तिथे ने ना धपाटा खावया पाठी

अता कंटाळले तारे नभाला आणि रात्रीला
म्हणे दिवसाच उगवावे रवीच्या दर्शनासाठी

विचारांची गुरेही स्वैर धावू लागली आता
जरा हाकावया त्यांना मनाची पाहिजे लाठी

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला काळा तिथे ने ना धपाटा खावया पाठी

उडी घेईल का तो पोहरा उपसावयासाठी?

हे मिसरे छानच. आणि यांच्यातले खयालही वेगळे वाटले..

उभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी या नदी काठी
किती वेळा इथे येऊ, तुला विसरावयासाठी?<<<

मी या मतल्याच्या प्रेमात पडलेलो आहे. लिटरली.

गझल छानच! विचारांची गुरे हा कल्पक खयाल व चित्रबाह्य असूनही वेगळ्या कवाफींमध्ये निभावला गेलेला!

अभिनंदन!

किती वेळ इथे येऊ तुला विसरावयासाठी - माझ्यासाठी अमर ओळ

पहिला आणि शेवटचा शेर आवडले.

उभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी या नदी काठी
किती वेळा इथे येऊ, तुला विसरावयासाठी?

मतला खूप छान आहे. मतला जितका सुरेख बरोब्बर त्याउलट दुसरा शेर अत्यंत तकलादू झालाय.

बाकीचे शेर ठीकठाक

( गेले काही दिवस पाहतोय, गझलेसाठी मोठे वृत्त अथवा एखादे अवघड वृत्त हाताळले तर ती गझल जास्त सुंदर असे काहीसे समिकरण गझलकारांच्या डोक्यात शिरलेले दिसते आहे. एकंदरीतच वियद्गंगाला सध्या चांगले दिवस आलेले दिसतात.... असो)

"सुटूदे हात हातातून पण तू जाण रे सखया
असे संपेल ना नाते, अशा सुटणार ना गाठी" >>> हा सर्वाधिक आवडला.

"कुठे गेली जुनी शाळा, फ़ळा काळा नि बाई त्या?
मला काळा तिथे ने ना धपाटा खावया पाठी" >>> यातील 'काळा' शब्द दोन अर्थाने वापरणे मस्त वाटले.

छान.

उभी निष्पर्ण झाल्यागत पुन्हा मी या नदी काठी
किती वेळा इथे येऊ, तुला विसरावयासाठी?

अप्रतिम.

सुटूदे हात हातातून पण तू जाण रे सखया
असे संपेल ना नाते, अशा सुटणार ना गाठी

आवडला. Happy

उभी निष्पर्ण झाल्यागत>>>>>> मी असे लिहिले होते ते आठवले ...जिणे निष्पर्ण झाडागत Happy
बाकी मुद्दे वर आलेच आहेत
गझल आवडलीच
उकाकाना आवडलेलेच शेर मलाही सर्वाधिक आवडले

मतलाही छानय

अता कंटाळले तारे नभाला आणि रात्रीला
म्हणे दिवसाच उगवावे रवीच्या दर्शनासाठी

किती छान कल्पक खयाल.

मतलाही सुंदर.

कवी प्राजू,

तुमच्या अलीकडच्या गझला म्हणजे अल्लडतेचे काठ असलेल्या गांभीर्याने भरलेल्या विहिरीसारख्या होत आहेत.

कळावे

गं स

कवी प्राजू,>>???? ...........ओ गं.स. 'लेडीजलोक्स्'ना ....'कवियत्री' म्हणतात !!!

तुमच्या अलीकडच्या गझला म्हणजे अल्लडतेचे काठ असलेल्या गांभीर्याने भरलेल्या विहिरीसारख्या होत आहेत. >>>>
काय गझलियत आहे या वाक्यात
क्या बात क्या बात वाहवा ...क्याबात !!

कवी वैवकु,

जिथे उंदीर तेथे मांजर या न्यायाने प्रत्येक प्रतिसादावर मृत्यूचे थैमान घालू नका. लोकांना बोलू द्यात.

कळावे

गं स

काठांसोबत अख्खी विहीरदेखील अजूनही अल्लडच आहे.

कवी उमेश,

यांस आपला अनुभव, अंदाज, 'कोल्ह्यासद्राक्षेपणा' की अपरिपक्वता म्हाणावे?

कळावे

गं स

गंभीर समीक्षक, काही गोष्टी गंभीर न होता व समीक्षा न करता ख-या आयडीच्या दृष्टीतून निर्मळ मनाने पाहिल्या तर 'अल्लडपणाचा' अर्थ कळेल असे वाटते.

तुमच्या अलीकडच्या गझला म्हणजे अल्लडतेचे काठ असलेल्या गांभीर्याने भरलेल्या विहिरीसारख्या होत आहेत.>>>
थोडसं स्पष्ट करून सांगाल का?