'अवलिया संत श्री पिंट्याक बाबा'

Submitted by अव्या खलिफा on 16 February, 2013 - 05:06

385369_413981275346996_1878112826_n.jpg

(सदर प्रकाशचित्र मी काढलेले नाही)

बर्यापैकी अश्शीच दिसणारी एक अवलिया विभूती मला कांदिवली लोखंडवाला परिसरात भेटली होती.
नेहमीच्या मारवाड्याकडे चहा पीत असताना अचानक प्रकट होवून मला ह्यांनी म्हंटल.

'बच्चा तू खूब तरक्की करेगा, ये सामने वाले बिल्डींग मे तुम्हे घर मिलेगा.....'
(मारवाडी चहा वाला गालातल्या गालात हसत होता)

मी म्हंटल 'पुढचं जाऊद्या.... आत्ता का बोलो'... तर म्हणे
'कठीण समय है बच्चा, पर बंदा है तू सच्चा,
बिवी से तुम्हारी बनती नही..... घर मे तुम्हारी कोई गिनती नही
( मी तीन ताड उडालो Proud ....म्हंटल कुठली बिवी आणि कुठली बायको...पण टाईम पास होत होता)

बरा मग पुढे क्या होगा मेरा ..इतना सब पोब्रेम है मेरेकू?
( मी आपलं मुडमध्ये विचारलं)
'बेटा अदृष्य शक्ती तुम्हारे साथ है, स्वयं भोलेनाथ जी का तुम्हारे पीछे हात है.'
यहासे अगले सोमवार को लाटरी का टिकट निकालना बेटा ...!!
तुम्हारे भाग्य खिलने वाले है अभी,

मी झ असाच बघत राहिलो त्याच्याकडे.....म्हंटल माझ्या चेहऱ्यावर
'मी सोपान आहे ' असं लिहिलंय कि काय ?

मग माझ्या डोक्यावर हात ठेवून काही तरी पुटपुटला
आणि 'कल्याणमस्तु ' असा अशिर्वाद दिला......
आणि वर म्हणतो ..बच्चा भोलेनाथ के नाम पे १०१ रुपया दान करले....और बाबाजी को चाय पिला .

आयला म्हंटल बरा धंदा आहे...... पैसे नाहीयेत सांगून एक कटिंग चहा पाजली आणि निघालो.
जाते वेळी परत ' बच्चा लाटरी निकालने भुलना नही...अच्छा समय आने वाला है तुम्हारा'
दिवसाच्या शेवटी एक कप चहाची सोय लावून त्यांनी फुकटचा सल्ला दिला.
:
:
पुढे हाच अवलिया एका पडीक रिक्षा मध्ये
चिलिम-गांजा, देशी दारू-तळलेला मासा घेऊन पिंट्याक Proud मध्ये देवाची साधना करताना दिसला होता.
मस्त समाधी लागली होती त्याची. Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवि.. छोटासा प्रसंग पण छान सांगितलास.. 'पिंट्याक' शब्द मस्तच Proud
छान लिहितोयस.. पुढिल लेखनास शुभेच्छा! Happy