खंत

Submitted by अनिल आठलेकर on 14 February, 2013 - 15:34

खंत

वेदनेला अंत नाही एवढे खरे...
सोसण्या मी संत नाही एवढे खरे....

जो जिव्हाळा काल होता लोपला कसा ?
काळजाला पंथ नाही एवढे खरे....

कोणता तो देश होता आपुला, म्हणे?
हरवल्याची खंत नाही एवढे खरे......

ऐकतो गीता कुणाची आज पार्थ हा ?
सारथी भगवंत नाही एवढे खरे.....

___अनिल आठलेकर,
१५ फेब्रुवारी २०१३ , पुणे

http://anilathalekar.blogspot.in/2013/02/blog-post_14.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users