'बिजांकुरली परेत जिद्द!'

Submitted by वैभव पाटेकर on 14 February, 2013 - 05:29

नमस्कार मंडळी !

मायबोली वर माझी लिहिण्याची ही पहिलीच वेळ. फार दिवसांपासून इथल्या कविता वाचत, अनुभवत आलो आहे. कवितेत रममाण होणे हा माझा खूप जुना छंद आहे आणि माझ्या काही निवडक मित्रांसोबत मी नित्यनेमाने काव्यानंद उपभोगतो आहे. मित्रांनो, कालच मायबोलीवर जॉईन झालो आणि आज कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी 'मराठी भाषा दिवस' साजरा करण्याविषयीचा, होत असल्याविषयीचा लेख वाचला.
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या 'कणा' या कवितेपासून प्रभवित होवून मला सुचलेली 'बिजांकुरली परेत जिद्द' ही माझी कविता आपणा सर्वांचा योग्य मान व आदर राखून इथे सादर करीत आहे. आपल्या सर्वांचे प्रेम 'मायबोली'वर ह्या मराठी गड्याला मिळेल अशी अभिलाषा आहे.

-वैभव वामन पाटेकर.

'बिजांकुरली परेत जिद्द!'

"घडले एकदा अघटीत असे, खिन्न झाल्या दाही दिशा
'वरुण' जाहला राज्यधारी, काळवंडली 'क्षितीज-उषा

मेघ माथी कभिन्न-काळे, करीत होते सहस्त्र वार
झोडून झोडपून काढले गाव, केले मनास शून्याकार

नियतीच्या कुटील माऱ्यात, मोडून पडले घर 'जुने'
नितळनाऱ्या ओल्या भिंती, खिदळणारे अंगण..'सुने'

सरसावले हात काही, नियत 'धन्य' दात्याची
तो थेंब होय मदतीचा कि बरसात-रात दु:खाची ?

नपुंसकी विचार खुद्द, घेईल ऋण करेल बद्ध
परावलंबी अनाहूत भीतीने, 'बिजांकुरली परेत जिद्द!'

नको नको भगवंता ! सहानुभूती माझ्या शिरी
जपली 'तत्व' मी जगाया ह्या उदंड काळ्या उरी

असेन आज गलितगात्र, विवंचनेच्या डोहात; परि
इंद्रप्रस्थ स्थापेन पुन्हा, पेलेन करी द्रोणागिरी !"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली
कणाची छाप जाणवली
परेत जिद्द >>>म्हणजे समजले नाही क्षमस्व !

मायबोलीवर हार्दिक स्वागत
अजून कविता येवूद्यात एक एक करत ... Happy

नमस्कार वैभवराव !
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

'परेत जिद्द !' -- परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी हे तुम्ह्नास ठावूक असेल, त्यातील ही परा. कुठलीही गोष्ट सुचते किंवा स्फुरते त्या घटनेचा अगदी पहिला उन्मेष जिथे होतो ती परा. अंत:करण पंचकाचा केंद्रबिंदू या अर्थी परा हा शब्द वापरला.