तुझाच मी !

Submitted by रसप on 13 February, 2013 - 23:58

माझा मीच न आता उरलो, तुझाच मी
तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !

अनेक प्रेमाच्या शब्दांना तूच उधळले
मी तर केवळ वेचुन-वेचुन त्यांस जमवले
तू कविता मी कवी जाहलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !

जुन्या-जुन्या दु:खांनी होतो गलितगात्र मी
तू येण्याच्या आधी होतो शून्यमात्र मी
माझ्या नकळत तुला गवसलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !

इथून पुढचा प्रवास अपुला बराच आहे
तुझी साथ हा एक दिलासा खराच आहे
तुझ्या प्रकाशामधे उजळलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !

....रसप....
व्हॅलेन्टाईन्स डे, २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/02/blog-post_14.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक प्रेमाच्या शब्दांना तूच उधळले
मी तर केवळ वेचुन-वेचुन त्यांस जमवले
तू कविता मी कवी जाहलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !.......... वा वा...क्या बात है!!!

इथून पुढचा प्रवास अपुला बराच आहे
तुझी साथ हा एक दिलासा खराच आहे
तुझ्या प्रकाशामधे उजळलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !

वा.

छान Happy

छान ..... सहज, साधे शब्द.
"इथून पुढचा प्रवास अपुला बराच आहे
तुझी साथ हा एक दिलासा खराच आहे" >>>> हे विशेषत्वाने आवडलं.