काव काव..

Submitted by पुरंदरे शशांक on 12 February, 2013 - 23:29

काव काव..

काव काव करतं कोण ?
कावळेदादा आण्खी कोण

तेलबिल लावलंय का
चकाचक कस्ले वॉव

तिरकी करतात मान अशी
झेप घेतात झटदिशी

डोळे फिरती गरागरा
कावकावचा एकच नारा

भातपोळी अग्दी नको
शेव जरा टाका म्हण्तो

(इथे आई-बाबा इ. मंडळींनी आपापल्या सोईनुसार "हवे नको" ते टाकावे -जसे
भात भरवायचा असल्यास

पिझ्झा बर्गर अग्दी नको
भात थोडा आणा म्हण्तो ----- असे करावे Wink Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users