मीच मोती शिंपल्याचा, शिंपलाही मीच आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 12 February, 2013 - 22:35

गझल
मीच मोती शिंपल्याचा, शिंपलाही मीच आहे!
चित्रही माझेच आहे, कुंचलाही मीच आहे!!

बांधणारा मीच होतो, सोडणारा मीच आहे!
मीच आहे पंख दोन्ही, शृंखलाही मीच आहे!!

त्या कुण्या कुब्जेतही साक्षात माझे रूप आहे!
कामिनीच्या अन् कटीची मेखलाही मीच आहे!!

मी निथळणा-या कुणाच्याही अरे घामात आहे!
झोपडी माझीच आहे, बंगलाही मीच आहे!!

भक्त मी, भक्तीतही मी, शास्त्र मी, शास्त्रज्ञही मी!
मीच विज्ञानात आहे, अन् कलाही मीच आहे!!

म्यान मी, तलवार मी, ती ढालही पण मीच आहे!
मीच ती फिर्याद अन् तो फैसलाही मीच आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सर्व शेर जीवनावश्यक वाटले
रदीफ म्हणजे मला परमेश्वराजवळ घेऊन जाणारे अलौकिक उद्गार वाटले

परमेश्वराचे वर्णन आहे Happy छान Happy

<<<बांधणारा मीच होतो, सोडणारा मीच आहे!>>> बांधणारा आणि तोडणारा अशी लिंक हवी ना? सोडणारा म्हणजे? ( लोकांना प्रेमाने जोडणे म्हणजे बांधणे, आणि वेळ आल्यावर ते नातं तुटणे म्हणजे सोडणे असाही एक अर्थ लागला...)

ते नाडीची गाठ बांधणे व सोडणे असेल ..आता कशाची नाडी ते मला प्लीज विचारू नका (..माझी अल्पमती !!!)

असो !! चेष्टा पुरे ................

माझे २ शेर आठवले

मी स्वतःच्या जाणिवांच्या झावळ्यांची झोपडी
...........आणि टोलेजंग माझा बंगला आहेस तू

सांगण्या माझी चहाडी प्रकृती गेली तिथे पण
..त्या बिचारीला न कळले त्या विटेवर मीच आहे

पुनःप्रत्ययाबद्दल धन्यवाद देवसर