स्वप्ने दुमडली, मुडपले मनाला!

Submitted by सतीश देवपूरकर on 12 February, 2013 - 09:32

गझल
स्वप्ने दुमडली, मुडपले मनाला!
इतका कसा मी खटकलो जगाला?

हे, प्राण मी सोडताना, समजले....
वैषम्य वाटे कुणाला कुणाला!

दारावरी नाव अद्याप माझे!
भिंती न खिडक्या न छप्पर घराला!!

उलटे न कोणासही बोललो मी;
गेलो न बदलायलाही कुणाला!

आहे असा हा, तसा तो फलाणा....
न्याहाळ आधी स्वत:चे स्वत:ला!

चिंता किती चेह-यावर शवाच्या .....
मेल्यावरीही न शांती जिवाला

इतकीच माझ्याच दु:खास चिंता....
लागू नये द्रुष्ट माझी सुखाला!

हल्ली असे ते भरवती प्रदर्शन....
करतात नुसते उभे नग नगाला!

काळे कशाला करू केस माझे?
बुरख्यात झाकू कशाला वयाला?

आला तुझा फक्त संदर्भ थोडा;
पडली किती आज कोरड घशाला!

वाचून हे शेर माझे कळावे.....
पडली घरे केवढी काळजाला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झाली आहे सर गझल शेरन् -शेर आवडला
नेहमीपेक्षा खूप वेगळी ...फ्रेश वाटली
वृत्त-काफिया : जमीन मस्त निवडलीत

दारावरी नाव अद्याप माझे!
भिंती न खिडक्या न छप्पर घराला!!

आला तुझा फक्त संदर्भ थोडा;
पडली किती आज कोरड घशाला!

<<<

शेर खूप आवडले

मतला सुमारे१५वर्षे पडून होता! आज स्फुरले!<<< यावर काय बोलू प्रोफेसर?

तो त्याखालचा स्मायली जो आहे तो पाहून धरतीमातेने पोटात घ्यावेसे वाटत आहे.

बरे झाले बेफीजी आपण सांगीतलेत !! देवसर माझे ऐकत नाहीयेत
तुमचेही नाही ऐकले तर हे स्मायलीपुराण सरळ देवमामींना सांगावे म्हणतोय ........... Happy

देवमामींच्या घरगुती तक्रांरीवर हे स्मायली दाखवल्यामुळे तर ते इथे येऊन गझला प्रकाशित करत आहेत.

आहात कुठे?

Light 1

गेलो न बदलायलाही कुणाला!
>>>> लोल
मग तुम्ही पर्यायी देता तो काय प्रकार आहे?

आणि तुम्ही त्या स्मायली कोणत्या दुकानातुन आणता? मलाही काही हव्या आहेत. ठोक भावात स्वस्तात मिळाल्या असतील ना?

चिखल्या अशक्य आहेस बाबा तू
प्रतिसाद प्रचंड आवडला

बेफीजी : मी अद्याप अविवाहीत असल्याने विवाहितांचे काय चालते ते मला माहीत नसल्याने मी तसा प्रतिसाद देवून बसलो क्षमस्व Wink

भूषणराव! धन्यवाद!

मतला सुमारे१५वर्षे पडून होता! आज स्फुरले!<<< यावर काय बोलू प्रोफेसर?

तो त्याखालचा स्मायली जो आहे तो पाहून धरतीमातेने पोटात घ्यावेसे वाटत आहे.
<<<<<<<<<<<
यात आश्चर्य काय आहे? असे अगणित मतले आमची वाट पहात आवासून आमच्या चिठोरग्यांवर थांबले आहेत! आम्हीच शिताफीने त्यांच्याशी फटकून वागतो! योग्य वेळ आली की, त्याचे सोने करतो!

तो स्माईली समजलेला दिसत नाही आपल्याला!
ते रेन लक आहे! कधी कधी परमेश्वर अशी शेरांची बरसात करतो आमच्यावर!
..........सतीश देवपूरकर

भूषणराव!
देवमामींच्या घरगुती तक्रांरीवर हे स्मायली दाखवल्यामुळे तर ते इथे येऊन गझला प्रकाशित करत आहेत.

आहात कुठे?
देवमामींच्यापुढे स्माईल कसले करताय? आणि स्मायली काय दाखवताय? आहो, कडकलक्ष्मी आहेत त्या आमच्या! सुसरबाई तुझी पाठ मऊ या तत्वाने आम्ही तरलो आहोत, त्यांच्यापुढे!
गझल असे नाव जरी काढले तरी आमचा उद्धार होतो! आमच्या चुकांचा पाढाच वाचला जातो!
शेवटी 'चुका त्याच त्या होत आहेत माझ्या, गुन्हेगार मी'.............हेच खरे!
प्रा.सतीश देवपूरकर

भूषणराव! आमच्या शेरांवरील देवमामींची नैसर्गिक प्रतिक्रिया अशी असते बघा.......
शेर ऐकवल्यावर हे असले भलभलते कुटिल काही तरी तुमच्या मनात चालते काय? वय काय आपले? पेशा कोणता आपला? कधी सुधारणार आपण? आपल्या मुलांची वये किती झाली आता? तेवढी तरी पोच आली का आपल्याला? इत्यादी सुविचारात्मक ज्ञानाचा ढोस त्या पाजतात आम्हाला व मग आम्हालाही तो बिनबोभाट प्यावाच लागतो कारल्याच्या रसासारखा! म्हणून मूड बघूनच आम्हास पवित्रेबाजी करावी लागते!

चिखल्या,
गेलो न बदलायलाही कुणाला!
>>>> लोल
मग तुम्ही पर्यायी देता तो काय प्रकार आहे?

आणि तुम्ही त्या स्मायली कोणत्या दुकानातुन आणता? मलाही काही हव्या आहेत. ठोक भावात स्वस्तात मिळाल्या असतील ना?
<<<<<<<<<<<<<<<
आम्ही पर्यायी देत नाही कुणाला, आमचे काव्यात्मक चिंतन फक्त समोर ठेवतो! कुणालाही पटायलाच पाहिजे, कुणी स्वीकारायलाच पाहिजे असा दुराग्रह अजिबात नसतो आमचा! कुणी बदलावे, बदल करावा असे आमचे म्हणणे नसतेच कधी! आम्ही कसे लिहिले असते ते फक्त आम्ही लिहून प्रात्यक्षिक दाखवतो! किती शहाणे व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे!

शोध घ्या म्हणजे स्मायली हातास लागतील! फुकट की, विकत हा नंतरचा प्रश्न आहे!

आला तुझा फक्त संदर्भ थोडा;
पडली किती आज कोरड घशाला!>>>

शेर अत्यंत आवडला.