मराठी भाषा दिवस २०१३ - लहान मुलांसाठी कार्यक्रम - बोल बच्चन बोल!

Submitted by संयोजक on 12 February, 2013 - 06:39

BBB - 3.jpg

आपल्या बच्चूंचे बोल ऐकायला दरवर्षीप्रमाणे आम्ही उत्सुक आहोत. 'मराठी भाषा दिवस, २०१३'च्या निमित्ताने भरवूया आपल्या बच्चेकंपनीच्या बडबडगीतांची मैफल.

वयोगट : २ ते ६ वर्षे
आपल्या बाळाच्या आवाजातल्या मराठी बडबडगीताचे ध्वनिमुद्रण / चलचित्रण करा आणि आम्हांला पाठवा.

या उपक्रमाचे काही नियम :

१) या उपक्रमामध्ये केवळ मायबोलीकरांचेच पाल्य सहभाग घेऊ शकतील.
२) ध्वनिमुद्रण अथवा चलचित्रण युट्युबवर चढवून ते त्या पाल्याच्या मायबोली पालकाने sanyojak@maayboli.com या ईपत्त्यावर पाठवावे. विषयामध्ये 'बोल बच्चन बोल' असे नमूद करायचे आहे.
३) ईमेलमध्ये आपला मायबोली आयडी, आपले नाव, आपल्या पाल्याचे नाव आणि त्याचे वय लिहावे.
४) प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख आहे २४ फेब्रुवारी, २०१३.

तर मग बच्चन, बोल!!

प्रताधिकाराचे नियम पाळायची सगळी मदार भाग घेणार्‍यांवर नाहीये आणि स्वतः मायबोली पुढाकार घेऊन परवानगी मिळवून देत आहे हे खुपच स्तुत्य आहे!

संयोजक माझ्या ४ वर्षाच्या मुलाला ह्या उपक्रमासाठी संदीप खरे - सलील कुलकर्णि ह्यांच्या 'आयुष्यावर बोलु काहि' ह्या अल्बम मधील 'मी मोर्चा नेला नाहि' हे गाण म्हणायच आहे (दुसर कुठलहि गाण म्हणणार नाहि अस त्याने सांगितल आहे). हे गाण ह्या उपक्रमाच्या निवडीच्या निकषात बसु शकेल का (वरती बडबडगीते लिहलय म्हणुन हा प्रश्न) आणि चालणार असेल तर संबंधित कवी आणि संगीतकारांची परवानगी त्यासाठी मिळु शकेल का? हे पान मी आत्ताच बघितल इतक्या ऐनवेळी विचारतेय त्याबद्दल दिलगीर आहे.

नमस्कार रमा.
संदीप खरे आणि फाऊंटन म्यूझिक कंपनी यांनी परवानगी दिलेली आहे, तरी तुम्ही प्रवेशिका पाठवू शकता. धन्यवाद.

Pages