विहिरीच्या काठावर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 February, 2013 - 02:53

विहिरीच्या काठावर
उभी सोडुनिया दोर
मनातला घाव मागे
गर्द हिरवा अंधार १
किती प्रेम शिंपायचं
किती नातं जपायचं
मन चिंध्या झाल्यावर
कुणा काय सांगायचं २
ठोठावून दार दार
वळ आले हातावर
कुणी कधी ऐकले ना
उरी गारठले स्वर ३
कुठे तरी अंधारात
सारं सारं विसरावं
खोल खोल एकांतात
बंध तोडूनिया जावं ४

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली कविता...

किती प्रेम शिंपायचं
किती नाते जपायचं
कुणा काय सांगायचं २
सारे सारे विसरावं
बंध तोडूनिया जावं ४ >>>>इथेही वर टिंब हवा किंवा पुढच्या शब्दांना मात्रा..
शिंपायचे, जपायचे, सांगायचे, विसरावे, जावे ..असे.

पुलेशु!

कथकलीजी,श्यामजी, वर्षाजी,शशांकजी,आणि भारतीजी धन्यवाद .श्यामजी बदल करतोय,सूचना बद्दल धन्यवाद .

मला आवडतात सुबक अष्टाक्षरी कविता. खूप छान झालीय. तेवढे 'ऐकांतात' चे ही एकांतात करून टाका म्हण़जे आणखी चांगले वाटेल पुढील वाचकांना.