घरपण

Submitted by अज्ञात on 10 February, 2013 - 00:30

घर चार कुडाच्या भिंती
घरपण अमृत रसना नाती
आकाश निळे झरणार्‍या चांदण राती
ओंजळी भरूनी स्वातीचे मोती

स्वप्ने जरतरी नयनी आतुर भरती
हृदयी गाभारा तृप्त तेवत्या ज्योती
आवेग कळांचे लाटेवर देहाच्या
रुधिरातिल माया ममता लय ओघवती

शरिरापलिकडले गोत सवे सांगाती
दुष्काळी निर्मळ सोबत नित अनुप्रीती
घर हे अनुभूती अनुबंधांची व्याप्ती
घरपण पण असते रेष रसिक रसरसती

....................अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात. गुरूजी, बरेच दिवसांनी दर्शन दिलेत. मस्त वाटले एकदम. तेच ते ल, झल, गझल, हझल, अफझल बगैरेवर मस्त ट्रीट दिलीत.

वाह !!

अज्ञात.... खुप सुंदर अर्थवाही शब्द
रोज नेमाने फक्त लिहणार्‍यांनी जरा वाचावे आणि आत्मपरीक्षण करावे असे लेखन Happy