आजकाल...

Submitted by बागेश्री on 9 February, 2013 - 04:13

तुझ्यापर्यंत पोहोचत
नाहीच मी, आजकाल

एकतर्फी प्रवास हा
टाळते आहे, आजकाल

इच्छांना आशेची
आस नाही, आजकाल

स्वप्नांना बंधमुक्त
करते आहे, आजकाल

मोकळे रस्ते, वाटा मोकळ्या
खुणावतात, आजकाल

निरोपानंतरची हूरहूर
गोठली आहे, आजकाल

तुझ्यातली अलिप्तता
पांघरून आहे, आजकाल

रिक्त मनाचं, स्थिरावणंही
भावतं आहे, आजकाल....!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बागेश्री,
कमी शब्दात छान लिहिलंयस. आणि वेगळा फॉर्मही आवडला.
फक्त
खूणावतात, पांघरूण, स्थिरावणांही
यातले टायपो प्लीज सुधार.

आभारी आहे सगळ्यांची... वेगळा फॉर्म ट्राय करायला मलाही आवडलं..
उकाका टायपो लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.

बाबा..
चूक झाली माझी....माफ करा मला प्लीज...
पुन्हा नाही करणार ही चूक...

तुम्ही आवर्जून वाचत आहात हे जगातलं सर्वांत मोठं कॉम्प्लीमेंट आहे...

छान !

एक एक सुटी ओळ कवितेचं बीज असल्यासारखी वाटली.

(थोडक्यात ९-१० कवितांचा कारभार एकातच संपवला आहेस... बिचार्‍या कवींच्या पोटावर पाय! :P)

सर्वांचे मनःपूर्वक आभार....
सुटसुटीत असा फॉर्म होता हा.. मजा आली लिहीताना...

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांमुळे लिखाणातला हुरूप टिकतो खरा...

कविता अपूर्ण राहिली आहे , असं जाणवलं .
परत वाचून बघितली . तरीही तेच वाटलं .

कदाचित अपूर्ण राहण्यातच तिचं पूर्णत्व असावं .