ज्ञान | यशाचे उगमस्थान ||

Submitted by विनायक. दि.पत्की. on 9 February, 2013 - 03:21

ज्ञान असते पाण्याहून पातळ,
नसे याहून अन्य कोणी नितळ.
प्रसंगी येवो कसलीही वावटळ,
बोथट होणे ज्ञानापुढे मात्र अटळ.||१||
धीर गंभीरता हि साधते ज्ञानाने,
निरव शांतता हि अनुभवावी मनाने.
हेच जमवावे कणाकणाने,
चराचरात असलेले घ्यावे अनुभवाने.||२||
यश असाध्य नसते,
शान सुद्धा जोडीला असते.
चेतन्य शरीरी वसते,
उरी समाधान हि ठसते.||३||
गरम दुध फुंकून पिणे,
मनाने आवडीची साखर घालणे.
स्थान परत्वे स्वताला बदलणे,
नव्या,नित्य,यशाची हीच आहेत साधने.||४||
(प्रत्येक ओळीतले पहिले अक्षर वाचावे )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्त जमलेय

ज्ञान-प्रबोधीनि हेच यशाचे उगमस्थान !!!

वा वा
शुभेच्छा

विनायक,
नमस्कार . . . .

धीर गंभीरता हि साधते ज्ञानाने,
निरव शांतता हि अनुभवावी मनाने.
हेच जमवावे कणाकणाने,
चराचरात असलेले घ्यावे अनुभवाने.||२|| > > > >

कोणितरी माझ्या घराचा पत्ता सांगावा असेच वाटले, फारच बोधपूर्ण रचना केलीत, आनंद झाला आहे हे वाचुन, आज तसेही मन ताळ्यावर नाहिच ह्या शरीराचे,

छान , छान . . . .

कल्याणम् अस्तु ||