मिसेस उर्फ पत्नी उर्फ बायको उर्फ सौ.

Submitted by विनायक. दि.पत्की. on 8 February, 2013 - 10:08

हात खन्डा ज्यान्चा करण्यात कामाचे पिसेस,
माझ्या मुळेच तुमचे बरे हे ज्यांचे विशेष .
नेहमीच ज्याना द्याव्या लागतात बेस्ट विशेस,
त्यानाच म्हणतात मिसेस.

ज्याच्या अभावी भासत असतेच सर्वशुन्य,
म्हणुन करावेच लागते त्याचे वर्चस्व मान्य.
घराची प्रगतीच त्यांच्या घ्यांनी व मनी
त्यांनाच म्हणतात पत्नी

माहेरचा वसा ,चालवतात सासरचा वारसा
त्यात कुठे ही न अडे प्रगतीचे पाउल पडे पुढे
ऋणकोला ही ज्या करतात धनको
त्यांनाच म्हणतात बायको

ज्यांना असते लहान थोरांची सहानुभुती,
त्याच्याच साठी करतात सर्व उठारेटी
तळ हातात ज्या जपतात सर्व नाती,
त्यांनाच म्हणतात सौभाग्यवती.

एक अधीक एक बरोबर एक,
सह जीवनात साथ असावी नेक.
नको तेथे संशयाची मेख
सहजीवनात ही असतातच व्यथा अनेक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

दसरा हा माझा वाढ दिवस या दिवसाचे निमित्त साधून सौ. ने स्मार्ट फोन भेट दिला त्या प्रसंगी दाटलेल्या भावना

....................माझे स्वगत .... ...

अर्ध शतक जीवनाचे आज पूर्ण झाले,
अनेक तास दिवसांचे चूर्ण झाले .

सरसरीत माझ्या कमीच तोटा ,
सखे, यात तुझा आहे सिहाचा वाटा.

पाहणाऱ्याला जरी दिसेल छोटी,
पण भेट तुझी मला सर्वात मोठी.

कशी तू माझी गरज शोधली ?
कल्पना याची तुला कोणी दिधली ?

त्या वर बायकोचे मनोगत.......................

तुमच्याच सहवासात मी धन्य झाले.
अधिकचे शहाणपण तुमच्यातूनच आले.

चार माणसांच्या घरात संगणक तीन
तिघांना तीन कोपरे रीकाम्यात मीच दीन

पण एकटे पणातच दडते सर्व हित
त्यानेच विचार मनी येतो अवचित

पैसा कमावण्या पेक्षा वापरावा जपून
पुंजीची गाठ बांधावी करकचून

टाकावू कशाला म्हणू नये
निरुपयोगी म्हणून हिणवू नये.

शोधा म्हणजे मार्ग सापडेल
निरुपयोग्याचा उपयोग आवडेल

राहिलेले सर्व टाकले विकून
सोबत करेन मी स्मार्ट फोन शिकून

पिकते तिथे विकत नसते

असा काही अनुभव असतो माझा हि आहे .तसेच कोणत्याही कवीने कविता लिहिली,लेखकाने लेख लिहिला कि ती कोणाला तरी ऐकवावी अशी भावना होते थोडक्यात कोणत्याही कलाकाराला त्याच्या कलेला दाद मिळाली तो पुन्हा भरारी घेत असतो एके दिवशी मी रात्री कविता लिहिली पण श्रोता कुठे तेव्हा सखीलाच ऐकवावी म्हटले तर तिकडे त्यांचे हि काही तरी महत्वाचे नियोजन झालेले असते मग कोण हरणार ? जो तो माझेच काम व्हावे म्हणून प्रयत्न करणार ना पण माझ्या सखीने जी वेगळ्या प्रकारे दाद (शुभेच्छा ) दिली ती मात्र अमुल्य आहे मलाही कळले नाही म्हणून त्या झालेल्या संवादावर परत हि दुसरी रचना लिहिली

मी:-
सखे....... जरा इकडे यावे
माझे काव्य ऐकून घ्यावे
प्रतिक्रियेने भरभरून द्यावे
श्रम परिहाराचे समाधान करावे

ती :-
दुध उतू जाईल लक्ष ठेवा
पेपर लोळतोय उचलून घ्यावा
झाडताना मधून बाजूला व्हावा
मग एवढा कचरा टाकून यावा

मी :-
दुध तापवून निट झाकले
पेपरचे सन्मान हि राखले
धुळीने सर्व अंग जरी माखले
एका दमात सर्व करून टाकले

ती :-
टाकी भरली का ते पाहावे
मग मोटरचे बटन बंद करावे
झाडालाही पाणी द्यावे
भाजीवाल्या वर लक्ष ठेवावे

मी :-
टाकी भरायला वेळ लागेल
तेवढयाच वेळात काम भागेल
तुझ्या मनासारखेच वागेल
दिलेल्या वचनाला हि जागेल

ती :-
पाणी निवेल लवकर स्नान करा
रंगाचे कपडे बाजूला सारा
बाकीचे कपडे मशीन मध्ये भरा
नाश्ता होई पर्यंत धीर धरा

मी :-
हो सगळे करतो धीर हि धरतो
एवढा वेळ मला नक्कीच पुरतो
पण तो पर्यंत माझी कविता वाचतो
आणि मग जमल्यास दुसरी हि रचतो

ती:-
पहिले दुसरे नको साकडे
तुमचे लक्ष असावे इकडे
हत्ती असून फोडतो लाकडे
तुम्हाला बोल नसावे वाकडे

मी :-
साकडे नव्हे हे अंतरीचे बोल
न झेलशी तर होती मातीमोल
सखे हि प्रतिभा नसावी फोल
तुझा प्रतिसाद मजला अनमोल

ती :-
काल एक नवीन दुकान मी पाहिले
दुकानदाराने वस्तूंचे गोडवे गाईले
नवे काय हवे ते बघत राहिले
गिरणीतले दळण आणायचे राहिले

मी :-
दळण हि आणतो, दुकानात हि जाऊ
तुला जे काही हवे ते सर्व घेऊ
आता माझी कविता ऐक पाहू
किती तरी या निर्वाणी तुला वाहू ?

ती :-
माझीच निर्वाणी तुम्हाला कळो
माझे अंतरंग तुम्हा सोबत जुळो
श्रोत्यांच्या अडचणी दूर पळो
श्रोत्यांची सोबत सतत मिळो

विनायक .दि.पत्की