स्प्लेंडिड क्वांग चौ- भाग ३

Submitted by वर्षू. on 7 February, 2013 - 23:38

http://www.maayboli.com/node/40890 - भाग १

http://www.maayboli.com/node/40893 -भाग २

http://www.maayboli.com/node/40896 - भाग ३

http://www.maayboli.com/node/40953-भाग ४

http://www.maayboli.com/node/41012 - भाग ५ (अंतिम)

खरंतर पार्कमधे एव्हढ्या प्रचंड प्रमाणात असलेली झाडं म्हणजे पार्कमधील रस्त्यांवर भरपूर मात्रेत पालापाचोळा असायला हवा...पण आश्चर्यम!! बागेतले रस्ते एक्दम साफसूफ..
साठीवरच्या वृद्ध कामगारांना रोजगारा व्यतिरिक्त वेळही चांगला ,फ्रूटफुल जावा म्हणून रस्ते झाडण्याच्या कामावर नेमले जाते. ते न कंटाळता हे काम मनापासून करताना दिसत होते.. समोरून फोटू काढून घ्यायला लाजत होते ..

आता लायनीने झाँकी सुरु झाल्या होत्या. इथे लोकप्रिय असलेल्या लोककथांमधली दृष्ये उभारण्यात आली होती.. ती पाहून चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर ओळखीच्या गोष्टीतली दृष्ये पाहून हसू फुटलं होतं

एक छोटुकलं , आजोबांशी लाडीगोडी लावून भरपूर खेळणी उकळत होतं Happy

ही धिटुकली परी , माझ्या हातात कॅमेरा पाहून मला मस्तपैकी पोझ देत उभी राहिली..

क्रमशः Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

वर्षुताई

धन्य ते चायनीज.... खरच मेहेनती लोक. हे सगळं उभारायचं, येवढ सगळ्ळं मॅनेज करायचं, स्वच्छता ठेवायची मुळात इच्छा आणि कळकळ असायला लागते.... खरच मस्त फोटो. तिन्ही बाफ वाचले. खुप मस्त...

झाँकी मस्त!! लोककथाद्वारे नववर्ष साजरं करायची कल्पना पण सहीच. प्रबोधन आणि मनोरंजन Happy
आणि परीही गोड. धन्यवाद वर्षू नील, तुमच्यामुळे हे सुंदर पार्क पहायला मिळालं.

अम्बाबाई, आनंद सागर चा रेफरंस कळला नाही.. मी कधी भारतात आले तर बघेन हां..
आणी हो, आपल्याकडील चांगल्या गोष्टींचा अभिमान जरूर बाळगावा, त्याचबरोबर इतर देशांतील चांगल्या गोष्टींची तारीफ करण्यात कद्रूपणा करू नये..

वर्षूता , नुसत आनंद सागरच नाही तर संपुर्ण शेगाव संस्थान हे पहाण्यासारख आहे. या संस्थानातल्या ५० पेक्षा जास्त संस्था आणि त्यांची सेवा कार्ये व शिस्त वाखाणण्याजोगी आहे.

वर्षु,फारच छान लिहीले आहेस.चिनी परिकथा-जातक कथा लहानांबरोबर मोठ्यांनाही विचार करायला लावणारे आहेत.दिलेले काम इमाने-इतबारे करण्याची वृत्ती -वयाचा,आत्मप्रौढीचा विचार न करता--हे विशेष जाणवले.

पहिल्या भागातले फोटो अप्रतिम आहेत. ह्या भागातला पहिला फोटो बघून मला जपानमधील जेष्ठ नागरिक आठवले. तिथेही त्या वयाची मंडळी स्वच्छता टिकवायची कामं उत्साहाने करतात.

मस्त Happy

वर्षु,फारच सुंदर लिहीलेस.

चिनी परिकथा-जातक कथा याविषयीही काही लिहि ना प्लीज - मला तरी जाणून घ्यायला आवडेलच...

सुरेख..

शशांक ,छान सुचवलास विषय.. आपल्या देशाप्रमाणे इथेही परिकथा,लोककथा यांचे विशाल भांडार आहे..माझ्या कुवतीनुसार हळूहळू इंट्रोड्यूस करत राहीन. माझ्याही अति जिव्हाळ्याचा विषय आहे हा Happy

Happy