राणी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 February, 2013 - 04:09

अॅडमिट डीसचार्ज
सारखी होत होती
राणी आजारला
कंटाळून गेली होती १
महिनो नि महिने
औषध खात होती
रोग का जात नाही
तिला माहिती नव्हती २
स्वप्नाळू डोळ्यातील
चमक गेली निघून
हताशेने कोंदाटून
जीवन गेले थिजून ३
नवखी एक डॉक्टर
गेली तिला सांगून
वाटत नाही आता बाई
उठशील तू यातून ४
औषधातला अवघा
मग रसच जावून
म्हटली राणी आईस
गावास जावू निघून ५
लाडक्या त्या लेकीसाठी
सगळीकडे धावून
वेडीपिशी झाली आई
रात्र दिन रडून ६
जगली का गेली राणी
न आले मज कळून
मोठे मोठे तिचे डोळे
मला दिसती अजून ७
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users