तुझे येणे जाणे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 February, 2013 - 04:08

तुझे येणे जाणे
असते जीवघेणे
जसे हाती नसते
फुलांचे फुलणे ..१
विसरलेली पुन्हा
कविता आठवणे
सावरलेले मन
होणे वेडे दिवाणे ..२
उपचार जरी ते
तुझे मोहक हसणे
घडे माझे त्यावर
पुन्हा वितळून जाणे ..३
जरी सहज असे
तुझे पाहणे बोलणे
पण माझे उगाच
नादान खुळखुळणे ..४
नको नको म्हणून
पुन्हा हवे असणे
हवे हवे असून
जीव घोर लावणे ..५
तुझे येणे जाणे ...

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणी किती लिहायचे ह्याचा एकदा एफ.एस.आय. ठरवून घ्यायला हवा.>>>>.सुंदर कल्पना आहे .पण आम्ही झोपडपट्टी वाले आहोत .तुम्ही इकडे येवू नका .तुम्हाला त्रास होत आहे .