पशुत्वाची case

Submitted by विनायक उजळंबे on 6 February, 2013 - 01:24

आता खुणावत नाही देवत्व..
न दानवत्व करी impress ..
कुणी तरी reopen केली आहे म्हणे ,
माझ्या पशुत्वाची case ..१

म्हणलं आधी आरोप करा सिद्ध ..
अन मगच करा मला बद्ध..
म्हणाले तुझे वाढतायत नख ,
तू बिनदिक्कत घेतो संभोग सुख..२

तुला करावेच लागेल बद्ध
किंवा ठेवावा लागेल अंकुश ..
देउ तुला नवा जन्म ?
तू होशील का माणूस?...३

"नको!!" त्यापेक्षा पशुच बरा ,
मी माझ्या नखांशी तरी राहीन खरा ..!!
अखन्ड मिळेल उजेड अणि वारा..
नहि अडवणार चार भिंतींचा पसारा... ४

माणूस झाल्यास कापावी लागतील सारी नखे ,
अन संभोग करावा लागेल अंधारात ..
अन त्यासाठी हि राजी करावे लागेल
देवा-ब्राम्हणांना अग्नीच्या उजेडात ...५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल्ली बलात्कार प्रकरणाचे भांडवल करणे कवींनी आता बंद करावे.

सहमत.

काय टिंब, काय चिन्ह, काय आकडे
हे सगळं आवश्यक आहे काय?
कविता वाटली नाही.

एकूणच माणूस म्हणून घ्यायला हवी त्याच्या अगदी उलट भूमिका घेतली आहे पशूची त्यामुळे या विचारांचे समर्थन कोणीच करू शकत नाही ..करणारच नाही

शब्दही घाणेरड्या पद्धतीचे व बरबटलेले असे वाटले

"नको!!" त्यापेक्षा पशुच बरा ,>>>> सर्वात खेदकारक लज्जस्पद निंदनीय ओळ !!!!!!!!!!!

दिल्ली प्रकरणाचे भांडवळ केलेत ते केलेत वरून काहीतरी हटके करायचे म्हणून असली कविता केलीत

निषेध !!!!!

इथे प्रकाशित केलीत ते असूद्या पण भर कवितासम्मेलनात नका पेश करू.... माता़-भगीनी , चपला-बुटांचा आहेर करतील (त्या योगाने बरी इफेक्टिव्ह झाली म्हणायची)

ही तशी खूप आधी लिहिली होती .

http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=826350&tid=5529255147869330822

या ठिकाणी Oct 18, 2010

अशी तारीख आहे .

त्यामुळे सगळ्या दिल्ली बलात्कावर विचार करणा-या विचारी लोकांचे अभिनंदन !!

बाजीराव मेंगाणे , समीर चव्हाण , गंभीर समीक्षक , वैवकु ,

प्रथमदर्शनी वाचल्यावर मलाही तसंच वाटलं होतं. पण म्हटलं छे छे , विनायकजींची कविता समजण्यात आपली काहीतरी चूक होतेय. मी पुन्हा पुन्हा वाचली आणि लक्षात आलं की कवितेचा अर्थगर्भ शेवट करण्यात विनायकजीँकडून शब्दवापरात अजाणतेपणानं थोडी चूक झालेली आहे. आशय तोच पण शब्द वेगळे हवे होते , कारण ते पशुत्वालाही लज्जीत करीत आहेत आणि कवितेचा शुद्ध हेतू प्रभावित करीत आहेत .
त्याकडे दुर्लक्ष केलं तर मला उलगडलेला अर्थ असा :

या कवितेतला पशू हा बलात्कारी पुरूष नसून तो निसर्गाचा घटक असलेला एक शुद्ध प्राणीच आहे . माणसाच्या वाईट वागणुकीने अचंबित झालेला कवी या प्राण्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि माणूस होतोस का ? असा प्रश्न विचारल्यावर माणसांचं वागणं बघून शरम वाटणारा तो प्राणी माणसासारखा बुद्धिमान प्राणी व्हायला चक्क नकार देतो आहे .

""नको!!" त्यापेक्षा पशुच बरा,
मी माझ्या नखांशी तरी राहीन खरा ..!!
अखन्ड मिळेल उजेड अणि वारा..
नहि अडवणार चार भिंतींचा पसारा... ४"

या ओळींतून तो त्याचं निसर्गसिद्ध जगणं सोडून , स्वतःचं स्वातंत्र्य लाथाडून चार भिंतींच्या पसाऱ्‍यात अडकून पडणारा माणूस नावाचा प्राणी बनण्यास तो नकार देतो आहे हेच सिद्ध होतं.

आधुनिक आधुनिक म्हणवून घेणाऱ्‍या माणसातल्या पशुत्वाचा बुरखा फाडण्याचा कवीचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

त्याच्याशी दिल्लीतल्या त्या नराधमांचाच नाही तर स्वातंत्र स्वातंत्र्य म्हणून स्वैराचाराचाच उद्घोष करणाऱ्‍या, स्वार्थाने बरबटलेल्या, विज्ञानाच्या प्रगतीचा माज चढलेल्या आपल्यासारख्या अत्याधुनिक माणसांचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहेच .

श्वापदे तरी आपल्या भावभावनांशी प्रामाणिक आहेत , पण इतक्या उदात्त संस्कृतींचा वारसा लाभलेला विश्वभरातला माणूस लाखो ग्रंथांचा अर्क गिळून महान बनल्याचा आव आणून खोट्या खोट्या शपथा घेऊन , वचनं देऊन , पूजा अर्चना , कर्मकांडं करून एवढा स्वार्थी , निर्लज्ज , अमानुष , हिंस्त्र का बनला आहे ?
हा भला मोठा प्रश्न या रचनेतून पुढे येतो आहे .

धर्मांधता , आतंकवाद , कर्मकांड , खून , बलात्कार करणाऱ्‍या माणसाच्या जगण्याचा एक जंगली पशूने केलेला हा धिक्कार आहे .

थोड्याफार फरकाने हाच आशय मांडणाऱ्‍या कमी संवेदनशील शब्दांतल्या माझ्या एका दीर्घ कवितेची लिंक इथे देत आहे.

इच्छा असेल तरच वाचावी.

http://www.maayboli.com/node/40552

Happy

मासरूळकर विनायकजींच्या कवितेबद्दल तुम्ही म्हणताय ते पटतेय

पण तरी ते पशूने संवाद साधणं दिसतच नाही किंवा अव्यक्त आहे इथे दिसत असलेल्या शब्दांमधे ओळींमधे

आता खुणावत नाही देवत्व..
न दानवत्व करी impress ..
कुणी तरी reopen केली आहे म्हणे ,
माझ्या पशुत्वाची case ..१>>>>>>>
>>>यातून कवी स्वतःबद्दल बोलतोय असेच दिसते याचा अर्थ ...तुम्ही सांगीतत्लेला अर्थ.....या कवितेच्या वाचकाना लागावा यात .....कवी प्रस्तावनेत कमी पडलाय !!!! असे म्हणता येईल

मग काय ....हे एका पशूचे मनोगत असून माणूस म्हणून माझे नाही असे आवर्जून एक्सप्लेन करावेच लागेल सादर करताना

म्हणाले तुझे वाढतायत नख ,
तू बिनदिक्कत घेतो संभोग सुख..२>>>>>>>

>>>>>>या दुसर्‍याओळीतून ओपन निसर्गात घेता येणारा संभोगाकडे कविता वळते पुढे समारोपाच्या कडव्यातही हा शब्द आलाय मग हाच कवितेचा आशयाचा विषयाचा सेंटर पॉइंट आहे असे वाटतेच ..अन् लक्ष दिल्ली प्रकरणाकडेच जाते

असो
हाय काय नाय काय

वैवकु ,
तुमच्या या दुसऱ्‍या प्रतिक्रियेशी सहमत.
प्रस्तावनेतील आशयहाताळणीत कमतरता आहे हे खरंच.

सुरूवात आणि शेवट आशय विचलित करत आहेत.

धन्यवाद .

वैभवजी ,

काही शब्दांमुळे कवितेकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका बदलू शकतो हे इतक्या प्रखरतेने या आधी ध्यानात आले नव्हते .
आपल्या प्रतिक्रिया मी समजू शकतो.
पण कविता तशा कुठल्याच अर्थाने लिहिली नव्हती जो आपण ग्राह्य धरला आहे .

मी लवकरच माझी मते मांडेन .
तरी कुठे भावना दुखावली गेली असेल तर माफी मागतो .
_______________________________________________________________

राजीवजी ,

संयमित प्रतीक्रेयेबद्दल मी आभारी आहे !!
तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेने कवितेकडे एकांगी न पाहता वाचक निश्चितच स्वतंत्र कविता म्हणून बघेल अशी आशा आहे .
तसेच ही कुठल्याच कृतीवर प्रतिक्षिप्त क्रियेसारखी आलेली कविता नाही हे पटेल अशी ही आशा आहे .

तुम्ही कवितेबाबत जे मुद्दे मांडले आहेत त्या बद्दल मला काही मते मांडायची आहेत .
लवकरच मी ती मांडेन !!

धन्यवाद
विनायक

माझ्या मते इतकं चवताळून उठण्यासारखं आक्षेपार्ह असं काहीच नाहीये ह्या कवितेत. अत्यंत हिणकस, ओंगळवाण्या, किळसवाण्या शब्दांनी व उपमांनी बरबटलेल्या ढिसाळ कविता डोक्यावर घेतल्या जातात. ही कविता त्या पठडीतली निश्चितच नाही. विचारांच्या मांडणीत विस्कळितपणा आहे, पण तो तर अनेक कवितांत असतोच की !
ह्या कवितेचा मला समजलेला अर्थ थोडक्यात -
माणसाची कातडी ओढून आता पशुच वावरत आहेत. त्यामुळे त्यांना देवत्व-दानवत्व हे काही समजतच नाही. हे ते मानत नाहीत. बनविणाऱ्याचंच अस्तित्व ते मान्य करत नाहीत म्हणून (बनविणाऱ्याकडून) त्यांना पशू संबोधलं जातं आणि मग सुरू होतेय ही 'पशुत्वाची केस'. मग आरोप-प्रत्यारोप करून त्यास दोषी सिद्ध केले जाऊन शिक्षा ठोठावण्याची वेळ येते आणि शिक्षा काय ? तर, 'आता तुला खरोखरचा माणूस करतो!' माणसाच्या रुपात इतकी वर्षं वावरणाऱ्या त्या जनावरास जेव्हा खरोखर माणसाचे रूप घ्यावे लागेल, असे दिसून येतं; तेव्हा त्याला त्याच्यातलं पशुपण जाणवतं आणि तो पशू 'माणूस करण्याची शिक्षा देऊ नका' अशी याचना करतो.
माझ्या मते मनुष्याच्या पशुत्वावर इथे एक खूप बोचरे भाष्य आहे. कवितेमागचा विचार खूपच वेगळा आहे. कदाचित तो अधिक चांगल्या प्रकारे सादर करता आला असता. माझं विनायकला नेहमी हेच म्हणणं असतं की, 'तू ५ वाक्यं बोलायच्या ऐवजी १ किंवा २ च वाक्यात बोलायला जातोस आणि त्यातून हवा तसा अर्थ पोहोचवला जात नाही.' पण असो. ही कविता मला तर खूप आवडली होती, आहे आणि आलेल्या तिखट प्रतिक्रियांकडे विनायक सकारात्मक दृष्टीने पाहून त्याच्या कवितेत अधिक सुस्पष्टता कशी आणता येईल असा विचार करेल, ह्याची खात्री आहे.

धन्यवाद !

....रसप....

मी काय लिहावे म्हणजे मी लिहिलेल्या कवितेच्या मांडणीचे समर्थन होईल याचा पुष्कळ विचार केला .
पण मला तितके सूत्रबद्ध लिहता आले असते तर ते कवितेत उमटले असते ..
अन शेवटी एकाच प्रश्न मला स्वत:ला पडला >>>>
विस्कळीत हीच एक मांडणी असू शकते का ?
जी मुद्दाम अणकुचीदारपणा साठी केली असेल !!

विस्कळीत हीच एक मांडणी असू शकते का ?>>>>

अत्यंत मौलिक प्रश्न
मला तरी हो असे याचे उत्तर वाटते आहे
मग असे करायचे असेल तर त्याचे जे़ काही टेक्नीक असेल ते समजल्यावर आम्हालाही सांगा