गुलमोहोर

Submitted by योगितापाटील on 4 February, 2013 - 02:25

डोळ्यांसमोर असणारा गुलमोहोर
दिसला कसा नाही मला इतके दिवस?
त्याचा लाल,भरगच्च बहर आजच का येउन भिडला डोळ्यांना?
बरोबर.....
आजच ऐकवलस ना तू मला गाण...
गुलमोहोर गर तुम्हारा नाम होता....
तेंव्हापासून प्रेमातच पडलेय बघ त्या गुलमोहोराच्या
तू नसलास ना तरी....तो असतो रोज डोळ्यांसमोर
तासन तास गप्पा चालतात माझ्या त्याच्याशी
सुखावत राहतो त्याचा बहर डोळ्यांना
आणि तू आल्यापासून तसाच बहर
माझ्याही आयुष्यात आलाय याचीपण जाणीव करून देत राहतो बघ
तू मनात भरून राहतोस ना तसाच.....
अगदी तसाच
तोही भरून राहतो मनात
देत राहतो मला उर्जा तशीच ....
जगण्याचा दिलासा.....
थोडासा गारवा....
आनंदाच शिंपण ...

आता पावसाळा सुरु झालाय
आणि गुलमोहोराला सापडलय अजून एक कारण...
तुझ्या आठवांनी कासावीस व्हायला
मुसळधार पावसात जेंव्हा निथळत राहतात थेंब
त्याच्या सर्वांगावरून
तेंव्हा मी पण होत राहते चिंब तुझ्या आठवणींच्या पावसात.....
त्याच्या पानांवरून ओघळणारे थेंब
झरत राहतात माझ्याही डोळ्यातून....

पावसाळा संपत आलाय आता
आणि सरणार्या पावसासोबत....
गुलमोहराचा बहरही गेलाय गळून...
आताही तो तसाच.... डोळ्यांसमोर.....बहराविना
आता त्याचा तो ओसरलेला बहर...
जाणीव करून देत राहतो मला
तुझ्या...माझ्या आयुष्यात असूनही..... नसल्याची ....
तोच गुलमोहोर.....
-योगिता पाटील

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users