तुला सांगितले होते...

Submitted by मुग्धमानसी on 4 February, 2013 - 02:22

तुला सांगितले होते...
नदी जन्मास येताना
तिला पाहून बर्फाचे
ह्रदयही वितळले होते

नभातून सांज होताना
जळी काळोख होताना
कुणी प्रत्येक चिमणीला
पिलाशी सोडले होते

कसा मेघांत गुदमरतो
गिरिंशी झोंबतो-लढतो
अशा वार्‍यास एका
चातकाने रडवले होते

कसा बेफाम दर्या
वादळाशी झुंज देताना
उरातुन चंद्र काही
चिंब ओले जपलेले होते

रुतावी खिन्न काळ्या
कातळातील रुक्ष निर्ममता
तिथेही पावसाने काल
मोती पेरले होते

तुला सांगितले होते...
असे नैराश्य गिळताना
उसासे थंड होताना
निखारे मंद विझताना
इथे उधळून सगळे
’त्या’ने काही राखले होते
तुला सांगितले होते...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला मी बोलले होते...
>>
ही वाक्य रचना चुकीची का वाटतेय Uhoh
मी तुला म्हणाले होते किंवा मी तुझ्याशी बोलले होते अस हवय का?
बघ ग एकदा Happy

काही काही कडवीच आवडली Happy

"तुला मी बोलले होते..." सोडून सगळ्या ओळी आवडल्या...
तुला मी बोलले होते ऐवजी त्याच अर्थाच्या दुसर्‍या ओळी अधिक समर्पक वाटतील...