दिवस

Submitted by के अंजली on 3 February, 2013 - 11:56

उन्हे उतरताना..
एक एक कवडसा..
मंदावत जातो.
जाऊन साठतो.
अंधाराच्या पार तळाशी..

रात्रीच्या गुजगोष्टी करुन..
पुन्हा येतात..एक एक करीत..
रामाच्या प्रहरी..
उमलतात..
प्रफुल्लीत टवटवीत..!

आणि आपण म्हणतो..
दिवस उजाडला..!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Good.