जमलेच नाही

Submitted by इस्रो on 2 February, 2013 - 07:31

कोणतेही काम करण्या, लाजणे जमलेच नाही
कारणे सांगून कोणा, टाळणे जमलेच नाही

राहिलो मी देत सारे, काय कोणा जे हवे ते
देत गेलो पण कुणाला, मागणे जमलेच नाही

पाडले त्यांनी मलाही, जावया माझ्या पुढे पण
चेव आला आणखी मज, हारणे जमलेच नाही

बोलती जे लोक मजला, तेच सारे ऐकले मी
दाटले जे आत माझ्या, सांगणे जमलेच नाही

खूप केले यत्न त्यांनी, झुकविण्या मज आणखीही
मोडलो मी पण कधीही, वाकणे जमलेच नाही

-नाहिद नालबंद
[भ्रमणध्वनी :९९२११०४६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप केले यत्न त्यांनी, झुकविण्या मज आणखीही
मोडलो मी पण कधीही, वाकणे जमलेच नाही

व्वा.. व्वा..!

"मोडला नाहिद कधी पण... वाकणे जमलेच नाही" ऐसा भी हो सकता था...

अर्थात, निर्णय गझलकाराचाच....

राहिलो मी देत सारे, काय कोणा जे हवे ते
देत गेलो पण कुणाला, मागणे जमलेच नाही

पाडले त्यांनी मलाही, जावया माझ्या पुढे पण
चेव आला आणखी मज, हारणे जमलेच नाही..... व्वा व्वा!!! सुंदर!