एखादा दिवस

Submitted by समीर चव्हाण on 1 February, 2013 - 06:15

एखादा दिवस येतो निरिच्छ
पडून राहतो पलंगावर सूर्य माथ्यावर येईस्तो
निराशेचे पडदे सरकू देत नाही
ना जळू देतो अभिलाषांचे दिवे

एखादा दिवस येतो घुसमटलेला
पडून राहतो कोनाड्यात सूर्य ढळेस्तो
बुब्बुळांच्या वाती विझत्या करतो
नि ओढून घेतो मीपण भयाच्या चादरीने

काळवंडून जावी मनातली हरेक प्रतिमा
तसा एखादा दिवस
भयाण, रात्रीहून काळाकभिन्न

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान...!

मात्र,
येईस्तो.., ढळेस्तो..., विझत्या...
असे शब्दप्रयोग टाळावेत असे काहींचे मत आहे. कारण, "ढळेस्तोवर" असा शब्द आहे. त्याचा फक्त बोलीभाषेतला उच्चार "ढळेस्तो" असा होईल. असो.

पण, मला चालतात.. Happy
मी नवे स्वीकारणारा आहे...

मी नवे स्वीकारणारा आहे...>>>>

हो हो ..पण आम्ही कुठे तुम्हाला जुने म्हणतोय Happy

वैभव,
>>>
मी नवे स्वीकारणारा आहे...>>>>

हो हो ..पण आम्ही कुठे तुम्हाला जुने म्हणतोय
<<<

अहो................ मी स्वतःला "जुना" किंवा "नवा" म्हटलेले नाही.................. तर नवे स्वीकारणारा म्हटले आहे. जरा लक्ष असू दे वाक्यरचनेकडे....... Lol

इथे प्रतिसादातून आपला एखादा जुना शेर देण्याची पद्धत आहे असे कळले. म्हणून हा शेर.....

काळास बंध नाही, प्रतिभेस काळ नाही...
होते नव्या जुन्याला घुसळून एक कविता..!