बी. कॉम. ला पुरक काँप्युटर कोर्स बद्दल माहिती ह्वी आहे.

Submitted by स्वाती२ on 31 January, 2013 - 14:02

माझ्या आईकडे काम करणार्‍या बाईंची मुलगी यावर्षी १२वी कॉमर्सला आहे. तिला बी. कॉम करता करता जोडीला काँप्युटर कोर्स करायचा आहे. कशा प्रकारचा कोर्स केल्यास उपयोग होईल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्वी ट्यालीचा कोर्स करायचे आता माहीत नाही.
मला विचाराल तर फक्त एक्सेल २००७ ५% आलं तरी खूप झालं. इतकं सुंदर आणि शक्तीशाली टूल मी आज पर्यंत पाहिलं नाही.

पुण्यात चिमण्या गणपति जवळ एक institute आहे( नाव लक्शात नाहि) तिथे चौकशि करा. बरेच courses आहेत. service Tax, Income Tax, vat हे सर्व शिकवले जाते. फी ३०-४०K आहे. पन ह्प्ता ची सोय आहे. नौकरी साठी पण प्रयन्त करतात.

एफ वाय - टी वाय बीकॉम साठी ऑपश्नल कॉम्पुटरचे विषय आहेत पुणे युनीवर्सीटी मधे. जर करायचेच असेल तर त्या विषयांचे क्लास केलेले चांगले,

FY-BCom
MS-Office
TAlly
C prog

SY-Bcom :
VB
MS Acess
SQL

तीला टॅली शिकता येइल. अजूनही बरेच सीए किंवा मिड साइज कंपन्या टॅली वापरतात. एक फु.स. खरतर टॅलीचा क्लास लावण्यापेक्षा, एखाद्या ओळखीच्या सीए कडे बारावीच्या सुट्टीत जाउन इंटर्नशीप केलीतर जास्त फायदा होतो. टॅली शिकतासुद्धा येते आणि ऑनजॉब ट्रेनिंगसुद्धा मिळते.

धन्यवाद मंडळी.

स्वाती बारावीच्या सुट्टीत इंटर्नशिपचा पर्याय सांगेन तिला.

मुलगी ठाण्याला आहे. मुंबई युनिवर्सिटीत पण पुण्यासारखे ऑप्शनल काँप्युटरचे विषय आहेत का? किंवा खाजगी क्लास लावून शिकायचे झाल्यास ठाणे-मुलुंड भागात चांगली इंस्टिट्युट कुठली आहे? माझ्या मुलाच्याच वयाची ही मुलगी खूप कष्टाळू आहे. तिच्या शिक्षणासाठी आवश्यक खर्च करायची माझ्या आईबाबांची तयारी आहे. we just want to help her to reach her full potential.

http://www.rudsetitraining.org/
http://www.rudsetitraining.org/pages/training.html

या ठिकाणी तिला सुट्टीच्या काळात विनामूल्य कोर्सेस करता येतील, जर ती त्यांच्या पात्रता निकषांमध्ये बसत असेल तर. तिथे कॉम्प्युटर टॅलीचेही कोर्स आहेत.

<< Eligibility

Any unemployed youth in the age group of 18-45 years, irrespective of caste, creed, religion, gender and economic status, having aptitude to take up self employment or wage employment and having some basic knowledge in the related field can undergo training which is totally free.

Interested candidates may apply to the nearby institute as per the application format given below and addresses of the Institutes are also available on this website.>>

Rural Development & Self Employment Training Institute

पुण्याजवळचे त्यांचे केंद्र :

http://www.rudsetitraining.org/pages/units.html

Varale Road
Near Eagle Agro Farm
Talegaon - Dabhade
410507
Pune District
rudset2007@rediffmail.com
S. K. Peshkar (CB)
फोन : 02114 – 225504
09850180449.

स्वातीचा सल्ला अगदी योग्य आहे. एखाद्या सी ए कडे प्रत्यक्ष काम केल्यास जास्त शिकता येईल. कोर्समधे फारसे शिकता येत नाही कारण तेवढ्या अवधीत सगळे शिकवता आणि शिकता येत नाही.
घरी कॉम्प्युटर असेल तर घरीच सराव करावा. फॉर डमीज, अशी बरीच पुस्तके बाजारात आहेत.

स्वाती२, थोड्या चाचौ, तीने कंप्युटर कोर्सच करायचे ठरवले आहे का? तसे असेल तर मग रीतसर आयटी फील्ड मध्ये जाण्यासाठी शिक्षण घ्यावे, जेणे करुन पुढे प्रोग्रामिंग, टेस्टिंग मध्ये जाता येइल. उदा. ग्रॅजुएशन नंतर MCA करावे, म्हणजे आयटी मध्ये जाण्याचा विचार करता येइल.
जर कॉमर्स बॅकग्राउंड ठेउन त्याच क्षेत्रात काही करायचं असेल तर बारावीनंतर सीए, सीएस, सीडब्लूए किंवा लॉ करण्यासाठी अ‍ॅडमिशन घेता येते. जर सीए. + टॅली किंवा + SAP असेल तर चांगली प्रगती होते. टॅलीचे कोर्स आणी बी. कॉम याने एका पॉइंट नंतर जास्त फायदा होत नाही. सीए, सीएस, सीडब्लूए - हे करता करता बी. कॉम डीग्री पुर्ण करता येते. हे फार कमी खर्चिक ऑप्शन्स आहेत.
अजून एक आजकाल बीबीए सुद्धा बारावी नंतर करता येते आणि तिथून पुढे एमबीए. हे एक चांगले फिल्ड आहे.

फु.स. बद्दल खरच सॉरी.

स्वाती, सॉरी वगैरे नका हो म्हणू. तुम्ही उलट आस्थेने विचारलेत हे पाहून बरे वाटले.

बी. कॉम करत काँप्युटर असे काही पक्के ठरवले नाहीये. तिचे सध्याचे ध्येय शिकून चांगली नोकरी मिळवणे आहे. पण सीए वगैरेचा अभ्यास कितपत झेपेल याबद्दल तिला खात्री नाही. बी. कॉम. करुन पुढे MCA वगैरे करायचे तर तिच्या घरचे तयार व्हायला हवेत. या मुलीच्या मोठ्या बहिणीचे लग्न लवकर झाले. हिचे लग्न बी. कॉम झाल्याशिवाय करु नका म्हणून माझ्या आईबाबांनी बाईंना पटवले आहे. त्यामुळे बी. कॉम करता करता जोडीला काँप्युटर्चे कोर्स असा पर्याय तिला ठीक वाटतोय. मी तिला तुम्ही सुचवल्याप्रमाणे बीबीएची चौकशी करायला सांगेन. धन्यवाद.