रचला तुझ्यावरती पुन्हा अल्लड तराणा

Submitted by तिलकधारी on 31 January, 2013 - 05:16

रचला तुझ्यावरती पुन्हा अल्लड तराणा
उडला पुन्हा परिपक्व दु:खांचा खकाणा

दारातल्या कुत्र्यापुढे पडताच पोळ्या
दारातुनी गेला भिकारी दीनवाणा

मुर्दाडतेची धाप हे आयुष्य आहे
जन्मास येणे फक्त मृत्यूचा बहाणा

बसतात काही पारवे खिडकीत माझ्या
बाकी दिवस जातो तसा कंटाळवाणा

कित्येक वर्षांनी कळाले की म्हणे ती
घेते अधेमध्ये चुकुन माझा उखाणा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! मतला बहोत खूब.

सगळी गझलच आवडली.

उखाण्याच्या शेरातल्या 'चुकुन' ह्या शब्दाची गंमत काही औरच वाटली.

धन्यवाद!

दारातल्या कुत्र्यापुढे पडताच पोळ्या
दारातुनी गेला भिकारी दीनवाणा

बसतात काही पारवे खिडकीत माझ्या
बाकी दिवस जातो तसा कंटाळवाणा

सुंदर.

रचला तुझ्यावरती पुन्हा अल्लड तराणा
उडला पुन्हा परिपक्व दु:खांचा खकाणा

बसतात काही पारवे खिडकीत माझ्या
बाकी दिवस जातो तसा कंटाळवाणा<<<

आवडले.

माबोवर स्वागत!

परिपक्व दु:खांचा खकाणा - वा वा

दमदार

>>
मुर्दाडतेची धाप हे आयुष्य आहे
जन्मास येणे फक्त मृत्यूचा बहाणा

बसतात काही पारवे खिडकीत माझ्या
बाकी दिवस जातो तसा कंटाळवाणा

हे shockingly beautiful!

बेफिकीर....

>>>>
आवडले.

माबोवर स्वागत!

परिपक्व दु:खांचा खकाणा - वा वा

<<<<<

बेफिकीर यांच्याशी सहमत.

आवडली !