बटर पालक

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 January, 2013 - 13:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालक १ ते २ जुड्या
२ कांदे चिरून
पाव वाटी काजू तुकडे
बटर २-३ चमचे
पाव वाटी भिजवलेली चणाडाळ
१ चमचा आल-लसुण पेस्ट
अर्ध्या लिंबाचा रस
३-४ हिरव्या मिरच्या
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
१ चमचा धणे
१ चमचा जिर
१ चमचा तिळ
५-६ मेथी दाणे
कढीपत्ता ७-८ पाने
२-३ दालचीनीचे तुकडे
चवीनुसार मिठ

क्रमवार पाककृती: 

१) धणे, जिर, मेथी, तिळ, दालचिनी वेगवेगळे भाजून घ्या. भांड्यात थोडे तेल टाकुन त्यावर कढीपत्ता खरपुस तळून घ्या.
२) सगळे एकत्र करुन तयार झालेले मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करा.
३) पालकला उकळी आलेल्या पाण्यातून काढून त्यात मिरच्या घालून पालकची पेस्ट बनवा.


४) भांड्यात बटर घालून त्यावर कांदा बदामी रंगाचा होई पर्यंत शिजवा.
५) कांद्यावर आल-लसुण पेस्ट टाकून परतवा.
६) ह्यात आता हिंग, हळद घालून पालकची पेस्ट, चणाडाळ आणि काजू घालून बेताचे पाणी घालून शिजू द्या.
७) चणाडाळ शिजली की त्यावर लिंबाचा रस, मिक्सरमधून काढलेला (धणे,तिळ, जिर, दालचीनी, मेथ्या, कढीपत्ता) सुका मसाला व मिठ घालून चांगले ढवळा व एक उकळी येउ द्या. झाले बटर पालक तय्यार. अजून चव येण्यासाठी सर्व करताना थोडा बटर ह्या पालकच्या ग्रेव्हीवर वाढायचा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

ह्यात अर्धा चमचा साखर घातली तरी वेगळी चव येईल.

मसाल्यांचे, मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचेच प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच,
आणि हो जागु ताई,
तुम्हाला अनेक पालेभाज्या माहिति आतिलच तर त्या कश्या शिजवाव्या आनि कश्या कराव्या ते पण लिहा ना. जसे पालकाचे अनेक प्रकार मेथि अनेक प्रकारे माठ, चवळि, हरभरयाचा पला वैगरे - वैगरे
आपल्या पाककृतिचि वाट पाहणारि
भाग्यश्री

मस्तच दिसत आहे भाजी...रंग एकदम टिकलाय!!

सकाळपासुन मी ते बालक पालक असे वाचत होते..मला वाटले अजुन एक रिव्यु आलाय..आता ग्रुप चे नाव वाचल्यावर कळल पाक्रु आहे ते Happy

अर्र... कुठलेच प्राणी दिसत नाहीत ह्यात ! अश्या 'सात्त्विक' रेसिप्या शोभत नाहीत तुमच्या बाफांवर.. Wink

अर्र... कुठलेच प्राणी दिसत नाहीत ह्यात ! अश्या 'सात्त्विक' रेसिप्या शोभत नाहीत तुमच्या बाफांवर..>>>+++११११

मासे पहायचि सवय झालि आहे आम्हाला...........

चला जागू आज फॉर अ चेंज पालक? Happy

ह्यात अर्धा चमचा साखर घातली तरी वेगळी चव येईल. >> फक्त अर्धा चमचा का? Uhoh
मला मूळात पालक आवडत नाही त्यामुळे...

मसाल्यांचे, मिरच्यांचे प्रमाण >> मी मसाल्यांचे ऐवजी माश्यांचे वाचलं चुकून.. Proud

चिन्नू, अंशा, रावी, मृनिष, जाई, भुंगा, मानुषी, दिनेशदा, श्री, अगो धन्यवाद.

भाग्यश्री वेळ मिळाल्यावर नक्की लिहेन.

पराग, सृष्टी, दक्षिणा Lol

जागु ताई, मस्तच रेशिपी गो.

मी आज केली होती, तर " पालक मला आवडत नाही व मी जन्मात कधी पालक खाणार नाही," आणि बटाट्याच्या भाजीशिवाय दुसरी भाजी आवडीने न खाणार्‍या माझ्या भावी नवरोबाने नुसत्या वासानेच मला वाढ , पालक असला तरी चालेल असे म्हणत मिटक्या मारुन खाल्ली चक्क Lol

धन्यु गो.

प्रितमोहर Lol अग असे प्रकार मला मुलीसाठी करावे लागतात. ती पण नुसत्या पालेभाज्या खात नाही. मग कधी कटलेटमध्ये, पराठे, पावभाजी, थालीपीठ, पुलाव मध्ये काही प्रमाणात भाज्या घालून देते. तू पण असे प्रयोग कर.

अखी धन्स.