कळी . . . . . . !

Submitted by राजीव मासरूळकर on 30 January, 2013 - 04:10

=@कळी@=

गुलाबकळीसम
तुझे ओठ ते
तव ओठांवर
नजर गोठते

डोळ्यांमधल्या
पाण्यामधुनी
अनुरागाची
घुमती गाणी

गालावरच्या
खळीत वाटे
विश्वभरातील
सौख्यच दाटे

कच(सं)भारातून
बट सुटलेली
भासे मज जणु
अमृतवल्ली

तुझा देह हा
विजेसारखा
पावसासवे
जाहला सखा

तुझ्या मिठीची
ऊब आगळी
मम मौनाची
फुलुन ये कळी !

- राजीव मासरूळकर
दि १४.१.२०१३
रात्री ९.४० वाजता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दकळा चांगली आहे . . . जरा उदात्त विषयांकडे वळा आता .>>>

बाजीरावजी , धन्यवाद .
(बाजीराव मस्तानी या विषयाचा विचार करावा म्हणतो .)