स्वप्नील- मुक्ता ची जोडी पुन्हा एकदा?

Submitted by मी मधुरा on 30 January, 2013 - 03:00

कोण-कोणाला स्वप्नील आणि मुक्ताची जोडी पुन्हा पाहायला आवडेल 'एका लग्नाची...'मालिके नंतर?
मला नक्की आवडेल.....आणि २०१३ च्या शेवटी एका नव्या चित्रपटातून ('मुंबई-पुणे-मुंबई' चा सिक्वेल) ते दोघ परत एकत्र काम करत असल्याचे कळले आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्निल रामदास पाध्येंच्या अर्धवटरावांसारखा दिसतो
आणि मुक्त बर्वे जरठ कुमारीका वाटते. + १०१

पण जोडी खूप छान दिसते. >>>>> प्रचंड अनुमोदन.

स्वप्निल रामदास पाध्येंच्या अर्धवटरावांसारखा दिसतो
आणि मुक्त बर्वे जरठ कुमारीका वाटते.>>
>>>> मला तो तात्याविंचुचा बाहुला वाटतो. Proud

New pic...

Sm.jpg

अजून एक ताजी बातमी....

मुंबई-पुणे-मुंबईचा सिक्वेल येतोय.....'लग्नाला यायचंच' या नावाचा चित्रपट....साहजिकच मुक्ता-स्वप्नीलची जोडी आहे; Happy आणि त्या आधी याच जोडीचा अजून एक चित्रपट येतोय.....कदाचित सगळ्यांना माहित आहे...."मंगलाष्टक वन्स मोअर"!!! Happy

तर मग लोकहो, ज्यांना हि जोडी आवडते त्यांच्या करता हि एक मस्त ट्रीटच आहे!!!

पुन्हा एकदा वाहता धागा..
अभिनंदन !!!>>>>>>>> अहं......हे गप्पांचंच पान आहे ग!!! फक्त गप्पा मारायला.

स्व व मुक्ता ह्यांना बघून कंटाळा आलाय.

ते दोघेही किती एकमेकांना खपवतात.... मुलाखतीत एकदम दोघेही... आम्ही एकत्र काम करणारच ... खूपच मजा आहे... वगैरे.
स्व जो जिथे तिते तशीच अ‍ॅक्टींग करतो.. पहिला ट्रेलर ह्याचा.

आज या सिनेमाचा टीझर फेबुवर पाहिला. सुजट्ट चेहेर्‍याचा, थोराड वयाचा न-अभिनेता स्वप्नील आणखी किती दिवस रोमॅन्टिक हीरो म्हणून मराठी सिनेमावाले खपवणार आहेत?

मधल्या रोमधल्या डावीकडच्या चित्रातला स्वप्नील, मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये लोक उभ्या उभ्या पेंगतात , तसा वाटतोय.

"मंगलाष्टक वन्स मोअर" मधली गाणी खुप मस्त आहेत.सर सुखाची....,दिवस ओल्या पाकळ्यान्चे....,उसवले धागे...... गुरु ठाकुर गीतकार असुन नीलेश मोहरीर ने सन्गीत दिले आहे. www.dhingana.com वर ऐकता येतील. Happy

आज या सिनेमाचा टीझर फेबुवर पाहिला. सुजट्ट चेहेर्‍याचा, थोराड वयाचा न-अभिनेता स्वप्नील आणखी किती दिवस रोमॅन्टिक हीरो म्हणून मराठी सिनेमावाले खपवणार आहेत? >> भारी Biggrin + १००

मुंबई-पुणे-मुंबईचा सिक्वेल येतोय.....'लग्नाला यायचंच' या नावाचा चित्रपट >> अरे अजुन लग्नच लावतायेत का?? कीती वर्षे लग्न करण्यात घालवणारेत Proud लग्नावरून यांची गाडी पुढे कधी सरकणार Uhoh
बारशाला कधी बोलवणार Biggrin

सुजट्ट चेहेर्‍याचा, थोराड वयाचा न-अभिनेता स्वप्नील आणखी किती दिवस रोमॅन्टिक हीरो म्हणून मराठी सिनेमावाले खपवणार आहेत? >>>> रोमॅन्टिक हीरो म्हणून????? नाही हो, नवीन आलेला टीझर पाहा!!! Angry man वाटतो तो!!!

Angry man वाटतो तो!!! >> स्वप्निल अ‍ॅंग्री यंग मॅन ? हे जरा जास्तीच होत नाही का ? Lol
तो घना टाईप्स रोल लाच ओके आहे. Biggrin

मंगलाष्टक वन्स मोअर ऑनलाईन कुठे पहायला मिळेल? सापडला नाही कुठेच मला... कोणाकडे लिंक असल्यास प्लीज द्या.

डेंजर आहे सिनेमा
नविन वर्षाच्या सुरुवातीला मी रड रड रडले सिनेमा बघुन Uhoh
स्वप्निलच्या जागी कोणीही चाल्लं असतं.
मुक्ताच्या जागी कोणीच चाल्लं नसतं. शी इज बेस्ट एव्हर!
गाणी सगळीच मस्त!
तुमच्या आमच्या घरात घडणारी स्टोरी आहे पण प्रचंड किरकिर आहे सिनेमात! नुसती रडारड... तिथे पडद्यावर त्यांची रडारड आणि माझ्यासारखं कोणी असेल तर पडद्याबाहेर आपली रडारड Sad
रडारडच करायचीये तर घरी बसुन करा.. पैसे वाया घालवू नका.
सेकंड हाफ गुंडाळल्या सारखा वाटतो.

बाकी त्यातुन जो सल्ला दिलाय तो आपल्याला माहीतच असतो. पण लग्न झाल्यावर स्वतःचं स्वतःला कळत नसेल तर कोणी तरी सल्ले दिलेले ज्या जोडप्यांसाठी बरे असतात अशांसाठी मस्त सिनेमा आहे.

मंगलाष्टक.....अजून नेट वर आलेला नाही.

यावेळी, रियाशी सहमत!!!

सिनेमात वैचारिक गोंधळ जाणवतो. करियर आणि व्यक्तिगत आयुष्य यातील तोल सांभाळण या बद्दल बरीच मत मांडली आहेत त्यात.