जबाबदारी.........© मंदार खरे!!!

Submitted by मंदार खरे on 29 January, 2013 - 08:26

शाळेचे वाचून पत्र
गारठून गेले गात्र

पाल्यास धाडण्यास सहलीला
सही करावी अर्जाला

प्रयत्‍न करु सुरक्षेचा’
निर्णय घ्यावा ज्याचा त्याचा

झालेच अघटित काही
शाळा जबाबदार नाही

डोळ्यात आसवे आली
कर थरथरती झाली

कशी करु सही?
विचार येई काही बाही

झट्कून स्व:ताची जबाबदारी
नामानिराळी शाळा जरी

जपला तळहाती जयासी
हवाली करु तयासी?

मुलास बहुदा ऊमजले
अश्रु माझे पुसले

काळजी नको रे डॅडी
सहलीस मी जात नाही

हुंदका गळ्यात गिळला
घट्ट मिठीत घेतला

कसे समजते चिमुकल्यांना
पालकांच्या अव्यक्त भावनांना

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !

धन्यवाद......

@वैवकू

हो.......तश्याच स्वरुपाचे पत्र आले होते, ते वाचुन वरील ओळी सुचल्या

प्रयत्‍न करु सुरक्षेचा’
निर्णय घ्यावा ज्याचा त्याचा

झालेच अघटित काही
शाळा जबाबदार नाही
>>>>>>>>>>>जर खरंच असं शाळेने लिहिलं असेल तर चांगलं फोकलवुन काढा मुख्याध्यापकांना (पण खरं वाटत नाही)

@vaibhavayare12345

खरच शाळेच्या संमती चिठठी मध्ये तशी तळ टिप असते

विश्वास नसेल तर कुठल्याही शाळेचे पत्रक वाचवे.........

It's fact!

@भरत मयेकर

धन्यवाद , हे पत्र माझ्याही वाचनात आले होते, मुळ लेखक माहीत नव्हते,

मी ही कविता सधारण १०/१२/१२ ला लिहली होती

कदाचित वरील पत्राचाही परिणाम असेल आणि तेव्हाच मझ्या मुलाचीही picnic जाणार होती

तेव्हा माबो वर नव्हतो