जीवनरेषा

Submitted by अज्ञात on 29 January, 2013 - 06:41

प्रेम असीम जलद विहारी
कोणी न जाणे अंत तयाचा
पवन दिशाहीन भ्रमरे भवती
रोखे गिरी वेग त्याचा
अजब जळी समीकरण असे हे बरसे जीवन रेषा सदनी
बरसे जीवन रेषा

मधुर स्वरे रसरंग परांनी
नटे अवनी हृदयी मनरमणी
वलये भली सुखसंवेदनांची
ज्योत झरे अंजनाची
गरज अटळ कळ तळकाळजाची बिन अक्षर परिभाषा वाणी
बिन अक्षर परिभाषा

शोध भरे ऋतु लयवित क्रांती
अविरत स्पंदन खल एकांती
मन साधन पण क्षितीज अनंत
लेश न गावे हाती
मनन स्मरण क्षण जतन करावे जनन मरण पडछाया देही
जनन मरण पडछाया

प्रेम असीम जलद विहारी कोणी न जाणे अंत तयाचा
कोणी न जाणे अंत

...........................अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेम असीम जलद विहारी
कोणी न जाणे अंत तयाचा
पवन दिशाहीन भ्रमरे भवती
रोखे गिरी वेग त्याचा
अजब जळी समीकरण असे हे बरसे जीवन रेषा सदनी
बरसे जीवन रेषा

व्वा !!!!

छान .....
"मधुर स्वरे रसरंग परांनी
नटे अवनी हृदयी मनरमणी
वलये भली सुखसंवेदनांची" या ओळी विशेष उल्लेखनीय वाटल्या.

अज्ञात,

आपल्याला प्रतिसाद बरोबर कळला.

मलाही आपण लिहीलेले कळाले नाही असेच म्हणायचे आहे.