**********___कौमार्यभंग___**********

Submitted by विनायक उजळंबे on 28 January, 2013 - 11:23

कौमार्यभंगासाठी ..
मी जागेच्या शोधात असता,

काल अथांग समुद्र पहिला ..
आणि विचार केला ,
जाऊत त्या बेटांवर ..
जिथे लाटा तयार होतात ..!

तिथे..
जिथे पालवी ऋतुस्नात झाली नसेल अजून ..!
आणि फुलांचा गंधही ,
स्पर्शला नसेल कोणी ..!

तिथल्या जमिनीचेही पावित्र्य ,
शाबूत असेल असून ..!
तिथल्या वा-याला ,
शरीर ही संकल्पना नवीन असेल ..!

जिथे चंद्र उत्तरेला उगवतो ,
अन सूर्य दक्षिणेला मावळतो ..!

अन मला अचानक जाणवले ,
कौमार्यभंग तर कधीचा झाला आहे !!!!!
त्याच जागेवर ..
जिथे कविता वाचायला सुरवात केली तुम्ही..
.
.
शिर्षकातच !

_विनायक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कौमार्यभंगासाठी ..
मी जागेच्या शोधात असता,

काल अथांग समुद्र पहिला ..
आणि विचार केला ,
जाऊत त्या बेटांवर ..
जिथे लाटा तयार होतात ..!

एखादा व्हर्जिन बीच शोधत असाल तर

http://www.maayboli.com/node/40554

या धाग्यावर गणेशगुळ्ळ्याचा अनटच्ड बीच आहे बघा.

IMG_2693.JPG

-का-व-ळा.

कावळा जी ,

कविता वाचुन हा फोटो आठवला असेलही तो छानही आहे .
पण हा अभिप्राय 'कवितेसाठी' नाही असे वाटले .

अशा अभिप्रायांनी नंतर वेगळेच वळण लागते असा अनुभव आहे .

मला अभिप्राय / फोटो आवडला आहे .
पण ,
कवितेतर अभिप्राय वि.पु त आले तर बरे होईल ना !!

चुकले असेल तर क्षमा करावी .

वेल्,असं असेल तर मी म्हणेन,

शेवटच्या कडव्यापर्यंत कविता आवडली. शेवटच्या कडव्यात प्रभाव संपतो.

आणि आपण चुकला नाहीत क्षमा मागू नका.,कवितेतर प्रतिसादाबद्दल मला क्षमा करा.

अन मला अचानक जाणवले ,
कौमार्यभंग तर कधीचा झाला आहे !!!!!
त्याच जागेवर ..
जिथे कविता वाचायला सुरवात केली तुम्ही..
.
.
शिर्षकातच !

ह्याच्यामुळे कवितेचे गांभीर्य निघून गेले. तुमच्या जाणीवा प्रगल्भ वाटतात पण, ह्या असल्या गोष्टी टाळत चला.

मला कविता कळलीच नाही Uhoh
अस काही म्हणायचं का की नाव वाचून तुम्ही कविता वाचायला घेतली तिथेच तुमच्या मनाचा कौमार्यभंग झाला?
(मला अस कळालं Sad ... नेमकं काय म्हणायचय? Uhoh विपूत सांगितलं तरी हरकत नाही )

I still remember the Day,
The Day i lost my virginity .
.
.
.
The day when you read my first poem!!

असे काही वाचले होते .
ते फार काल डोक्यात राहिले !!

हे तशा अर्थाने लिहिले !
पण बहुदा कमी पडलो असेन हे पोहोचवण्यासाठी !!