किनारा

Submitted by छाया देसाई on 13 October, 2008 - 23:04

पाहीन वाट राणी होईन मी किनारा
ये लाट दूरवरुनी बहरीन मी किनारा

ही रेत रोमरोमी भिजुनी पुन्हा भिजाया
आतूर हो नव्याने भेटीन मी किनारा

लखलखित क्षण कणाना मी सावरीन ये तू
घेऊन दिव्य क्षण ये चमकीन मी किनारा

तू भेटता सरकती क्षण पाउले नकळता
हरपून भान सारे हरवीन मी किनारा

भेटीत तू दिलेल्या रंगीत शिंपल्यांच्या
या जपत स्पर्श रेखा रंगीन मी किनारा

जाताच ध्यास पुन्हा घे यायचा सखे तू
सखये तुझ्याच साठी थांबीन मी किनारा
छाया देसाई

गुलमोहर: 

छाया -
तू भेटता सरकती क्षण पाउले नकळता
हरपून भान सारे हरवीन मी किनारा

भेटीत तू दिलेल्या रंगीत शिंपल्यांच्या
या जपत स्पर्श रेखा रंगीन मी किनारा

छान नि मस्त .आवडले!!