=@मही माय म्हणे@=

Submitted by राजीव मासरूळकर on 28 January, 2013 - 08:13

=@मही माय म्हणे@=

मही माय म्हणे मले, जाय वावरात मेल्या
तुह्या एवढाल्या पोऱ्‍ही निंदाखुरपाले गेल्ह्या

मह्याएवढा झाला आता, कामंधंदे पाह्य जरा
गाव गुरवणं दे सोडून , बंद कर येरझारा

तुही रांड आल्यावर मले कडंकडं खात जईन
"आयतंखऊ सांड मह्या गळ्यात गुतोला", म्हणत जईन

रोज रोज धुण्यामंधी कपडे टाकतू भाराभर
मह्या फाटक्या लुगड्याह्यची जरा तरी लाज धर ?

पोरीची जात आस्ता तं येधुळ दोन्तीन जंदले आस्ते
धगड्याच्या धाकात रहून दगडंधोंडे रांधले आस्ते

मायवर मव्हं फिरलं डोखं , म्हणलो , चाललो वावरात
सगळा गहू भिजवून येथो , संध्याकाळी हुईन रात

जाय मह्या राज्या, म्हणत माय झाली थंडी
पुन्हाक म्हणे, लवखर येझू, करून ठुते आंडी !

- राजीव मासरूळकर
मासरूळ, बुलडाणा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाय मह्या राज्या, म्हणत माय झाली थंडी
पुन्हाक म्हणे, लवखर येझू, करून ठुते आंडी !

वा !!! क्या बात ह्है!

मस्त काव्य.