पौष्टिक धिरडे

Submitted by शांकली on 22 January, 2013 - 09:30

खरंतर हा अगदी पारंपारिक पदार्थ आहे. मी यात घरात असलेली पिठं वापरली. ठरवल्यापासून पटकन होणारा पदार्थ असल्यामुळे इथे शेअर करावासा वाटला.
साहित्य :
ज्वारीचं पीठ १ वाटी
बाजरीचं पीठ १ वाटी
नाचणीचं पीठ १ वाटी
बारीक रवा (कच्चा) पाव वाटी
२ कांदे बारीक चिरलेले
चिरलेली कोथिंबीर
४ लसूण पाकळ्या बारीक चिरून (लसूण पात मिळाली तर मस्त.)
लाल तिखट, हळद, ओवा, मीठ आणि जिरं.

कृती : सर्व पिठं, रवा, चिरलेला कांदा, कोथिंबीर, लसूण एकत्र करून पाणी घालून नेहेमीप्रमाणेच धिरड्याला भिजवतो तितके सैलसर भिजवून घ्यावे. त्यात चवीनुसार लाल तिखट, हळद, ओवा, मीठ, जिरं, घालून १० मिनिटं झाकून ठेवावं.

नंतर नॉनस्टिक पॅनवर धिरडी घालून गाजराच्या लोणच्याबरोबर खावीत.

वरील प्रमाणात ४ माणसांना पुरतील इतकी धिरडी होतात.

माहितीचा स्रोत : पारंपारिक पदार्थ.

टीप : पिठाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काही बिघडत नाही. बर्‍याचदा ज्वारी बाजरीचं पीठ थोडं जुनं झालं की त्याच्या भाकरी नीट होत नाहीत. अशावेळी ही धिरडी केली की पिठं संपतात. किंवा याच पिठांची थालिपिठंही छान होतात.

patrika 100.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पदार्थ. माझ्या घरी बर्‍याच वेळेला होते. भाज्या पण त्यातच घातल्या कि वेगळी भाजी पण करावी लागत नाही.

वर्षू नील,

>नंतर नॉनस्टिक पॅनवर धिरडी घालून गाजराच्या लोणच्याबरोबर खावीत.<

सबब गाजराचे लोणचे असावे.

मी कालच केली होती ही धिरडी माझ्या पिल्लासाठी.. त्यात बाजरीचं पीठ, तांदूळाचं पीठ नि बेसन घातलं होतं.. बाकी सगळी हिच कृती.. मस्त होतात नि लागतात.. Happy

मस्त.

भाज्या पण त्यातच घातल्या कि वेगळी भाजी पण करावी लागत नाही.>>>
यात भाज्या कोणत्या व कशा घालाव्यात दिनेशदा?