विंडो ऑफ द वर्ल्ड

Submitted by वर्षू. on 20 January, 2013 - 05:26

क्वांग चौ हून केवळ १४० किमी वर असलेल्या ' शेंझेन' शहरात जवळ जवळ ११८ एकर जमीनीवर , विभिन्न देशांतील प्रसिद्ध, निरनिराळ्या १३० पर्यटन स्थळांच्या लहान प्रतिकृती निर्माण केलेल्या आहेत. या कलाकृती इतक्या सुंदर आहेत कि चीन मधील काही प्रमुख पर्यटन स्थळांमधे या विंडो चा नंबर बराच वरचा आहे.

प्रवेश फी १८०० रुपये वयस्कांकरता तर १२०० रुपये बालकांकरता अशी घसघशीत आकारण्यात येते.
आत शिरल्यावर पायी चालायचे नसल्यास मोनो रेल, बालोद्यानात असते तशी झुकझुक गाडी, स्वतःच चालवता येण्याजोगे स्कूटर्स उपलब्ध आहेत, अर्थातच या साधनांचा उपयोग करायचा असल्यास वेगळं भाडं भरावं लागतं.

आत शिरल्यावर ठिकठिकाणी स्टँड्स वर टूरिस्ट्स करता मोफत नकाशे ठेवलेले आहेत. त्यांशिवाय हा सर्व प्रवास कठीणच.

इथे प्रामुख्याने युरोप, आशिया,ओशेनिया, आफ्रिका आणी अमेरिका या रीजन्स मधील पर्यटक स्थळांचा सामावेश केलाय. इतर रीजन्स मधील उत्तर अमेरिकेतील ब्राझील आणी दक्षिण अमेरिकेतील चिले, मेक्सिको, पेरू इ. देशांतील काही उल्लेखनीय स्ट्रक्चर्स ही पाहायला मिळतात. याशिवाय युरोपिअन शॉपिन्ग स्ट्रीत, एशिअन स्ट्रीत, युरोपातील चर्चेस , जगभरातील प्रसिद्ध शिल्पं, पुतळे इ.ही अमाप संख्येत विखुरलेले आहेत..

चला तर आता ,'विंडो ऑफ द वर्ल्ड' मधे झटपट डोकवायला..

हे पाहा प्रवेशद्वार

आत चला..अर्रे हे काय..
तिकिटं काढायपूर्वी बाहेरच्याच परिसराचे फोटू काढण्यात गुंतायला होतं

हां चला.. आता नकाशे हातात घेऊन..

आत शिरल्याशिरल्या पहिलंच स्ट्रक्चर पाहिलं आणी बरं बरं वाटलं..

एमरल्ड बुद्धा टेंपल- थायलँड

ग्रँड पॅलेस- थायलँड

श्वेतागोन पगोडा- बर्मा

मशीद प्रांगणातील अरेबियन चौक

या मॉन्युमेंट चं नांव मिस झालंय.. Uhoh

ताजमहल..

चायनीज अनारकली कि नूरजहाँ, हौसेने हे भाड्यावर मिळणारे कपडे घालून फोटो काढून हेत होती

स्टेपविहीर- मोधेरे- भारत

ईजिप्त चे पिरॅमिड

लगेच तिथे या दोन हंप वाल्या उंटावर बसून एक जेमतेम तिथल्यातिथेच चार पावलं फिरून यायची सोय केलेली होती. ३०० रुपये एका मिनिटाला या हिशोबाने हौस भागवून घेत असलेली मंडळी..

वेलकम टू अमेरिका

न्यूयॉर्क न्यूयॉर्क

नायगारा

जागोजागी रस्त्याच्या कडेने असलेल्या वाहत्या कनाल्स मधे खादाड मासे सोडलेले आहेत.. तिथेच त्यांच्यासाठी ब्रेड,काहीबाही धान्य विकायला असतं. ते टाकलं की शेकड्यांनी हे मासे धावून येत होते

अर्र आता तर त्यांचा कुंभ मेळा चाललायशी गर्दी झाली..

अतिशय देखणे मासे होते.. (हळूच जागू ची आठवण आली Lol )

आयफिल टॉवर- इथे वरपर्यन्त जाण्याची लिफ्ट द्वारे सोय केलेली आहे.

वेस्टमिन्स्टर पॅलेस्/पार्लमेंट

युरोपभर फिरवून आणणारी छोटुशी झुकझुकगाडी

अजूनही बरेच फोटो काढलेत पण इथे थोडे टाकलेत , या जागेचा फील येण्यापुरते Happy

युरोप भागातील बर्फ नगरी.. इथे स्कीईंग ची सोय आहे, बर्फांच्या घरातून हिंडता येतं. भाड्याने -० टेंपरेचर ला लागणारे जॅकेट्स, बूट्स उपलब्ध आहेत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नताशा.. Happy

दिनेश दा.. Happy माझा ही हाच उद्देश्य असतो इकडले फोटोज टाकण्यामागे.. नेक्स्ट गटग करता किती किती इंसेंटिव्ह्ज दिले ..

अरे व्वा ... मस्त आहे ही खिडकी Happy
एकाच खिडकीतुन सगळ्या जगाचा देखावा दिसतो Happy

वर्षूताई,

खूपच सुरेख! जागच्या जागी जगाची सैर! एकदम मस्त! Happy

प्रतिकृती असली तरी या वास्तूची भव्यता नजरेत भरते. नाव काय हिचं? माझा अंदाज की ती मध्य आशियासारख्या कुठल्याश्या प्रांतातली असावी (समरकंद?). चुभूदेघे.

आजून एक गोष्ट सांगायची म्हणजे बकिंगहम पॅलेसच्या चित्रात दाखवला आहे तो वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे व बिगबेनचा मनोरा आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामाजी.. धन्यु.. चूक सुधारलीये Happy
ते दुसरं स्ट्रक्चर मधेच उभारलेलं आहे... नांव गुगलून पाहावं लागेल..

किती सुंदर कल्पना आहे ही................

तिनशे रुपये मिनिटाला आणि तेही उंटावर बसायला हे वाचुन हौसेला मोल नसते याची आठवण झाली Happy

मस्तचे.........

हायला ... वर्षुताई कुठे कुठे फिरते आहेस सध्या!!!! आधी टॉयलेट रेस्टॉरंट आता हे...... नव्या वर्षात अजब गोष्टिंचा खजिना मोकळा करणार आहेस का......

ताई,
कुठे कुठे जातेस मस्त आणि आम्हाला पण सफर घडवत असतेस... तुझ्या ह्या चित्रदर्शी सफारींसाठी खूप आभारी आहोत Happy

ही तर प्रकार महान आहे, तुझे कमेंटस ही एकसे एक आहेत!

नेक्स्ट डेस्टिनेशन, क्या है?

वर्षुतै धन्यवाद मस्त सफर घडवून आणलेयेस , प्रची तर एकदम खासंच आणि ते Koi फिश दाटीवाटीने आहेत म्हणून नाहीतर फिशटॅन्क मध्ये सुंदर दिसतात माझ्या कडे आहेत, त्यांना खायला घातलेकी चांगले असते अस वाचलय Happy

वर्षु,
खरंच ...चायना इज ग्रेट !
(खुप दिवसांनी टाकलेले) हे फोटो पाहुन छान वाटलं..

(पुढच्या फोटोची वाट पाहतोय ..)

अरे वा! मस्तच आहेत की! त्यांच्या न्यूयॉर्क मधे अजून वर्ल्ड ट्रेड सेंटर टिकून आहे मात्र! Proud

Pages